scorecardresearch

तोतया डॉक्टर वाडकरकडून ८ वर्षांत शेकडो बनावट मृत्यूचे दाखले ?

वाडकर हा बोगस असल्याने त्याने दिलेले सर्व मृत्यूचे दाखले (डेथ सर्टिफिकेट) बनावट असल्याचा पोलिसांचा संशय आहे.

वसई : तोतया डॉक्टर सुनील वाडकर याने आठ वर्षांत शेकडो बनवाट मृत्यूचे दाखले (डेथ सर्टिफिकेट) दिल्याचा पोलिसांचा संशय असून आहे. वाडकरने दिलेल्या या मृत्यूच्या दाखल्यांची आणि त्याने दिलेल्या विम्याचे दावे पोलीस तपासणार आहेत.

वाडकर हा बोगस असल्याने त्याने दिलेले सर्व मृत्यूचे दाखले (डेथ सर्टिफिकेट) बनावट असल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्यामुळे पोलीस २०१३ पासून २०२१ या आठ वर्षांच्या कालावधीत शेकडो मृत्यूचे दाखले दिले आहेत त्यांची सत्यता पडताळून पाहणार आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

अनेकांना वाडकर याने बनावट वैद्यकीय विमा दिला आहे. त्या विमा कंपन्यांशी पोलीस संपर्क साधून या विम्यांची सत्यता पडताळणार आहेत. पोलीस आयुक्तांकडून गंभीर दखल घेतली गेली आहे. पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्या विशेष पथकाने सापळा लावून सुनील वाडकरला अटक केली होती. मात्र या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विरार पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याने आरोपींच्या साथीदारांनी पुरावे नष्ट केले होते. त्याची गंभीर दखल पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी घेतली आहे. सुनील वाडकरची पत्नी डॉ. आरती वाडकर दंतचिकित्सक असताना गर्भपात केंद्र का चालवायची, याचादेखील पोलीस तपास करत आहेत.

वाडकर आणि हेमंत पाटील एकाच रॅकेटचा भाग

वसई पोलिसांनी अटक केलेला तोतया अस्थिरोगतज्ज्ञ हेमंत पाटील आणि तोतया सुनील वाडकर हे एकाच टोळीतील सदस्य असल्याचे पुरावे हाती लागले आहेत. दोघांनीही २००७ साली महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची (महाराष्ट्र मेडिकल काऊंसिल) बनावट नोंदणी घेतली होती. ते दोघे एकत्र काम करत होते, अशी कबुली हेमंत पाटील याने दिली आहे.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Fake dr sunil wadkar given hundreds of fake death certificates in eight years zws

ताज्या बातम्या