भाज्यांच्या दरात घसरण, सामान्यांना दिलासा

मागील काही दिवसांपूर्वी काही भाज्यांच्या दराने शंभरी गाठली होती.

थंडीच्या आगमनामुळे आवक वाढल्याचा परिणाम

विरार :  मागील काही दिवसांपूर्वी काही भाज्यांच्या दराने शंभरी गाठली होती. सध्या भाज्यांची आवक वाढल्याने वसई-विरारमध्ये भाज्यांचे दरात घसरण पाहायला मिळाली. भाजीपाल्याच्या दरात १५  ते २० टक्क्यांनी घसरण झाली असल्याची माहिती भाजी विक्रेत्यांनी दिली आहे. यामुळे सामान्यांना दिलासा मिळाला आहे.

सातत्याने वाढणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमुळे आणि अवकाळी पावसाने भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले होते. करोना काळात कोलमडलेल्या आर्थिक परिस्थितीबरोबरच नागरिकांच्या स्वयंपाकघराचे गणितसुद्धा बिघडले होते. पण टाळेबंदीत आणलेली शिथिलता आणि थंडीच्या आगमनाबरोबर भाज्यांची आवक वाढली.   वाहतुकीची सुविधा सुलभ झाल्याने नालासोपारा पूर्व येथील संतोष भुवन येथील भाजी मंडईत दररोज २५० हून अधिक भाजीपाला गाडय़ा दाखल होत आहेत. तसेच विरार आणि वसईमध्येही गाडय़ांची संख्या वाढल्याची माहिती भाजी विक्रेते तुकाराम बेकरे यांनी दिली.  मागील काही आठवडय़ांच्या तुलनेने या महिन्यात हे दर १५ ते २० टक्क्यांपर्यंत खाली आले. आगामी काळात मोठय़ा प्रमाणावर हे दर कमी होणार होण्याची शक्यता  आहे. घाऊक बाजारातील दर कमी झाले असले तरी अजूनही किरकोळ बाजारात मात्र घाऊक दराच्या तुलनेने भाज्यांच्या किमती जास्त आहेत. कारण घाऊक बाजाराच्या २० ते ३० टक्के अधिक दराने भाज्यांची विक्री किरकोळ बाजारात केली जाते. यामुळे सामान्य नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी अजूनही काही भाज्यांचे दर आवाक्याच्या बाहेर आहेत. 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व वसई विरार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Falling vegetable prices common man ysh

Next Story
रस्ते दुरुस्तीच्या कामांना गती
ताज्या बातम्या