scorecardresearch

Premium

वसईत पिता-पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या; चिठ्ठीत धक्कादायक कारण आलं समोर

वसईतील मुळगाव येथे राहणार्‍या पिता पुत्राने एकाच वेळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

disuza
वसईत पिता-पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या, चिठ्ठीत धक्कादायक कारण आलं समोर

वसई- वसईतील मुळगाव येथे राहणार्‍या पिता पुत्राने एकाच वेळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. डिसोजा पिता-पुत्रांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली असून त्यानुसार तीन जणांना वसई पोलिसांनी अटक केली आहेवसई पश्चिमेच्या मुळगाव येथील मोठेगावात डिसोजा कुटुंबिय राहतात. त्यांच्या जमिनीचे एक प्रकरण तलाठी कार्यालयात प्रलंबित होते.

हेही वाचा >>>विसर्जनादरम्यान विरार पारोळ येथील गणेश भक्ताचा बुडून मृत्यू

murder young woman mokhada taluka
पालघर : खुनी हल्ला करणाऱ्या तरुणाची आत्महत्या
Khadakwasla dam
कौटुंबिक वादातून खडकवासला धरणात तरुणाची आत्महत्या
minor raped half naked and bleeding viral video
“फाशी द्या किंवा गोळ्या घाला”, उज्जैन बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या वडिलांची मागणी
parents care assets, responsibility children, Section 23 Indian Penal Code
मातापित्यांची मालमत्ता हवी, पण त्यांची जबाबदारी नको?… वृद्ध आई-वडिलांनी हे वाचायलाच हवं!

जमिनीच्या वादातून एडविन डिसोजा (५५) आणि त्यांचा मुलगा कुणाला (२८) यांना काही कार्यकर्ते त्रास देत होते त्यामुळे डिसोझा पिता-पुत्र तणावात होते या तणावातून शुक्रवारी सकाळी दोघा पितात मित्रांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.आत्महत्येपूर्वी डिसोजा पिता-पुत्रांनी लिहिलेली चिठ्ठी लिहिली असून ४ जणांची नावे लिहिली आहेत. त्यानुसार पोलिसांनी स्वप्निल डिकुन्हा, राविकुमार वर्मा आणि नईम अशा आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे, अशी माहिती वसई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनिल पवार यांनी दिली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Father and son commit suicide by hanging in vasai amy

First published on: 22-09-2023 at 20:05 IST

संबंधित बातम्या

क्विझ ×