वसई: मागील दोन वर्षांपासून रखडलेल्या पालिकेच्या निवडणूक प्रक्रियेला पुन्हा एकदा वेग आला आहे. वसई-विरार शहरासाठीची अंतिम प्रभाग रचना निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे.
त्या अनुषंगाने प्रभागांची अंतिम अधिसूचना, नकाशा हा पालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. करोनाचे संकट व विविध प्रकारच्या अडचणी यामुळे वसई विरार महापालिकेची निवडणूक ही रखडली होती.
आता सर्वोच्च न्यायालयाने ही लवकरात लवकर निवडणुका घेण्याच्या संदर्भात निवडणूक आयोगाला आदेश दिल्याने पुन्हा एकदा पालिका निवडणुकांच्या हालचालींना वेग आला आहे. नव्या तीन सदस्यीय प्रभाग रचनेनुसार पालिका हद्दीत ४२ प्रभाग तयार करण्यात आले आहेत.या नव्याने तयार केलेल्या प्रभाग रचनेवर फेब्रुवारी महिन्यात प्रारूप प्रभाग आराखडा तयार करून त्यावर हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. यात पालिका हद्दीतील नागरिकांनी ७९ इतक्या हरकती व सूचना नोंदविल्या होत्या. यात ६२ हरकती या सरहद्दीबाबत, ८ हरकती या वर्णनाबाबत व इतर ९ हरकतींचा सामावेश होता. तर गावराईपाडा येथील १५७ नागरिकांनी सामायिकरीत्या नोंदविलेल्या हरकतीवर फेब्रुवारीमध्ये सुनावणी झाली होती. त्यात हर इच्छुकांमध्ये आनंदाचे वातावरण
नुकताच सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जाहीर करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यामुळे करोनाचे संकट, विविध प्रकारच्या कारणांमुळे रखडलेली पालिकेची निवडणूक जाहीर होणार असल्याने विविध राजकीय पक्ष व इच्छुक उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. उमेदवारीसाठी इच्छुक असलेले उमेदवार व विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांनीही आपली मोर्चेबांधणी सुरू केली असून सर्वसामान्य नागरिकांच्या भेटीगाठी यासह विचारपूस, विविध सामाजिक कार्यक्रमांचे नियोजन यांना जोर आला आहे. निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे. कतींचे स्वरूप व म्हणणे विचारात घेऊन आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे त्यांची पडताळणी करून अंतिम अभिप्रायाचा मसुदा विवरणपत्रमध्ये राज्य निवडणूक आयोगास सादर केला होता. यामध्ये ७९ पैकी ३० हरकती पालिकेतर्फे मान्य करत त्या राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केल्या होत्या. त्या हरकतीमध्ये जे काही बदल असतील ते करून पुन्हा एकदा अंतिम रचना जाहीर करण्यात येणार होती. मात्र याच दरम्यान या निवडणूक प्रक्रियेला स्थगिती मिळाल्याने ही सर्व प्रक्रिया ठप्प झाली आहे. नुकताच काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार निवडणूक आयोगाने वसई विरार महापालिकेची अंतिम प्रभाग रचना राजपत्रात प्रसिद्ध केली आहे. वसई विरार शहरातील नागरिकांनी हरकतीनुसार सुचविलेले बदल करून ही प्रभाग रचना जाहीर केली आहे. याची माहिती पालिकेचे संकेतस्थळ व प्रभाग स्तरावर प्रसिद्ध करण्यात आल्याचे पालिकेने सांगितले आहे.