scorecardresearch

बैलगाडा शर्यतप्रकरणी भाईंदरमध्ये गुन्हा दाखल

डांबरी रस्त्यावर बेकायदा बैलगाडय़ांची शर्यत घेऊन बैलाला गंभीर जखमी केल्याप्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

बैलगाडा शर्यतप्रकरणी भाईंदरमध्ये गुन्हा दाखल
दोन  व्यक्ती  बैलांना वेगाने पळवत असतानाच गंभीर दुर्घटना झाली असल्याचे दिसून आले आहे.

भाईंदर : डांबरी रस्त्यावर बेकायदा बैलगाडय़ांची शर्यत घेऊन बैलाला गंभीर जखमी केल्याप्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या संदर्भातील चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाली होती.

नाताळ सणानिमित्त २६ डिसेंबर रोजी भाईंदर पश्चिम येथील उत्तन भागातून अनेक नागरिक हे काशिमीरा चर्च येथे येतात. यात अनेक नागरिक हे पारंपरिक बैलगाडीने प्रवास करतात. मात्र यातील अनेक जण हे भर रस्त्यात बैलगाडी शर्यत घेत असल्याचे दिसून येते. अशाच एका शर्यतीची चित्रफीत समाज माध्यमांवर  प्रसारित झाली होती. यामध्ये

दोन  व्यक्ती  बैलांना वेगाने पळवत असतानाच गंभीर दुर्घटना झाली असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे जनावरांवर झालेल्या या अमानुष कृत्यावर कठोर कारवाई करण्याची लेखी तक्रार वकील किरण शर्मा यांनी पोलीस आयुक्तांना केली होती. त्यानुसार या चित्रफितीची पडळणी करून भाईंदर पश्चिम पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती साहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास बाबर यांनी दिली.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-01-2023 at 05:06 IST

संबंधित बातम्या