भाईंदर : उत्तन येथील चौक बंदरावर उभ्या बोटीला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये बोट पूर्ण जळाल्याने मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले आहे. समुद्रात मासेमारीला जाण्यासाठी ‘जॉन पॉल’ नामक बोट उत्तनच्या चौक बंदरावर सज्ज ठेवण्यात आली होती.अशा परिस्थितीत शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास या बोटीला अचानक आग लागली.आ

गीची तीव्रता इतकी अधिक होती की भर समुद्रात ही बोट पूर्णत: जळून खाक झाली. यामुळे साधारण २५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या बोटीवर साधारण वीस कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालत होता. त्यामुळे शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी मच्छीमारांकडून करण्यात येत आहे.

India Wholesale Inflation Reaches 3 Month High
घाऊक महागाई दर मार्चमध्ये किंचित वाढून तिमाही उच्चांकावर
Sakkardara flyover, Nagpur,
नागपूर : भरधाव वाहनांसह अपघाताच्या भीतीचे सावट, सक्करदरा उड्डाण पुलावर मागील वर्षात १३ अपघात
The Food and Agriculture Organization of the United Nations has projected an increase in wheat production worldwide including in India
भारतात यंदा उच्चांकी गहू उत्पादन? काय कारण? जगात काय स्थिती?
village maps
गाव नकाशे नसल्याने मच्छीमारांचे अस्तित्व धोक्यात, पंचवीस वर्षांपासून प्रतीक्षा