आगीचा धोका कायम

अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयात लागलेल्या आगीने पुन्हा वसई-विरारमधील रुग्णालये आणि  आस्थापनांचा अग्निसुरक्षा लेखापरीक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

अग्नीसुरक्षा लेखापरीक्षणाचा अहवाल बनविण्यात पालिका व्यग्र

विरार :  अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयात लागलेल्या आगीने पुन्हा वसई-विरारमधील रुग्णालये आणि  आस्थापनांचा अग्निसुरक्षा लेखापरीक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. वसई-विरारमधील शेकडो रुग्णालये आणि आस्थापना अग्निसुरक्षा यंत्रणेखाली आणण्यात पालिकेला अद्याप  यश आलेले नाही.  पालिकेकडे आजतागायत  अग्निसुरक्षा लेखापरीक्षणाचा कोणताही अहवाल उपलब्ध नाही. शहरातील आस्थापना धोक्यात असतनाही पालिका केवळ कागदी घोडे नाचवत आहे.

अहमदनगर प्रमाणे विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयात लागलेल्या आगीनंतर पालिकेन शहरातील शासकीय आणि  रुग्णालयांना तसेच इतर आस्थापनांना नोटीस बजावन्याचे काम सुरु केले केले होते. यावेळी पालिकने शहरातील २७७ रुग्णालयांना आणि चार हजारहून अधिक आस्थापनांना नोटीस बजावल्या होत्या. यात केवळ कोविड उपचारासाठी असलेल्या ४० रुग्णालयांचे पालिकेडून अग्नीसुरक्षा लेखा परीक्षण करण्यात आले होते. विजय वल्लभ दुर्घटनेला सहा महिन्याचा कालावधी ओलांडला तरी  महानगरपालिका केवळ नोटीस बजावण्याचे काम करत आहे.     

पालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार अग्नीसुरक्षा लेखापरीक्षण झाल्याशिवाय कोणत्याही रुग्णालयाला परवानगी दिली जात नाही. दर सहा महिन्यांनी अग्नीसुरक्षा लेखा परीक्षण करणे बंधनकारक असताना या रुग्णालयांचे अहवाल सुद्धा वसई-विरार अग्निशमन दलाकडे नाही. केवळ अहवाल बनविले जात असल्याची माहिती दिली जात आहे. तर दुसरीकडे पालिका केवळ स्वत:च्या रुग्णालयाचे लेखापरीक्षण झाल्याचा गाजावाजा करत आहे. मे महिन्यानंतर आजतागयत एकाही रुग्णालयांचे संपूर्ण लेखापरीक्षण सदर झाला नाही. पालिकेने पुन्हा नोटीस बजाव धोरण सुरु केले आहे.

अग्निशमन विभागाचे उपायुक्त शंकर खंदारे यांनी माहिती दिली की, महानगरपालिकेने सर्व रुग्णालयांना नोटीस पाठविल्या आहेत. यावेळी त्यांना केवळ ७ दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. ज्या रुग्णालयांनी ७ दिवसाच्या आत अहवाल सादर केले जाणार नाहीत त्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, तसेच वसई-विरार महापालिका क्षेत्रातील शाळा, कॉलेज, शिकवण्या, मॉल, हॉटेल, सरकारी इमारती, सिनेमागृह रहिवाशी इमारती, बँका, वाणिज्य गाळे, औद्योगिक वसाहती आणि इतर सार्वजनिक इमारती यांना सुद्धा नोटीस बजावल्या आहेत. पालिकेकडून युद्ध पातळीवर काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.   मळालेल्या माहितीनुसार मागील चार वर्षांतील आगीचा आकडा पाहता सन २०१७ रोजी ६८६, सन २०१८ मध्ये ८१९, सन २०१९ मध्ये ८०३, सन २०२० मध्ये ६५९ आगी लागल्या आहेत. तर २०२१ चा अहवाल अजूनही हाती आला नाही. आगीच्या घटना दरवर्षी होत असताना पालिका केवळ नोटीस बजावण्याच्या पालिकेकडे जात नसल्याची टीका केली जात आहे.

९० टक्क्याहून अधिक रुग्णालयांनी अग्नीसुरक्षा उपकारांचे काम जवळपास पूर्ण केले आहे. पालिकेकडे काहींनी अहवाल सादर करण्याचे काम सुरु केले आहे. काही जुन्या नागरी इमारतीत रुग्णालयाचे काम बाकी आहे पण ते सुद्धा पूर्ण केले जाईल.

– डॉ. संजय मांजलकर, अध्यक्ष,  नालासोपारा डॉक्टर असोसिएशन

केवळ नोटिसा

२०१९ मध्ये सुरत लागलेल्या आगीनंतर पालिकेने ४००० हून अधिक आस्थापनांना नोटीस बजावल्या होत्या. पण त्याचे कोणतेही अहवाल उपलब्ध नाहीत. त्यानंतर भंडारा जिल्ह्यात लागलेल्या आगीनंतर वसई-विरार महानगर पालिकेने सर्व रुग्णालयांना  आणि आस्थापनांना नोटीस बजावून अग्निसुरक्षा लेखापरीक्षण करण्याचे आदेश दिले होते. पण त्यावर कोणतीही कारवाई केली नाही. त्यानंतर पुन्हा विजय वल्लभ रुग्णालयातील दुर्घटनेने पालिकेने २७७ रुग्णालयांना अग्निसुरक्षा लेखापरीक्षण करण्याच्या नोटीस बजावल्या, पण कोणतीही कारवाई नाही. यामुळे पालिका केवळ कागदी घोडे नाचवत आहे. शहराची सुरक्षा धोक्यात असताना पालिका केवळ सोपस्कार करत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व वसई विरार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Fire hazard persists ysh

ताज्या बातम्या