विरार : वसईच्या विद्या विकासनी शाळेच्या खेळाचे सामान ठेवण्याच्या गोदामाला अचानक आग लागली. आग लागली त्यावेळेस शाळा सुरू होती. शाळेत परिक्षा सुरू असल्याने काही मुले पेपर देऊन घरी गेली होती. पण जी मुले शाळेत होती. यांना तातडीने शाळेच्या पटांगणात आणण्यात आले आणि अग्नीशमन विभागाने तातडीने आग विझवली. यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : पहिली बाजू : पूर्वग्रह संघाचे की टीकाकारांचे?

वसई पश्चिमेला असलेल्या विद्या विकासनी शाळेच्या तळ मजल्यावरील खेळाचे साहित्य ठेवण्याच्या गोदामाला बुधवारी सकाळी ११.३० च्या सुमारास आग लागली. यावेळी शाळा सुरू होती. पण सध्या परिक्षा असल्याने या परिसरात विद्यार्थ्यांचा वावर नव्हता. यामुळे कोणतीही जीवीत हानी झाली नाही. पण गोदामातील साहित्य जळून खाक झाले.

हेही वाचा : “…म्हणून भाजपानं शिवसेना फोडली” जयंत पाटलांचं स्पष्ट विधान, एकनाथ शिंदेंच्या वक्तव्याचाही केला उल्लेख

अग्निशमन विभागाने माहिती दिली की, सदरची आग ही शॉक सर्क्रीटमुळे लागली असून १५ ते २० मिनिटात आग विझवण्यात आली. शाळेचे अग्नीसुरक्षा लेखा परिक्षण झाले आहे. पण त्यांनी पुर्णपरनगी घेतली आहे की नाही याची पाहणी केली जात असल्याचे पालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी दिलीप पालव यांनी सांगितले आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fire in school warehouse at vasai no casualties virar tmb 01
First published on: 12-10-2022 at 14:57 IST