वसई : शहरातील वाढत्या आगीच्या घटनांच्या पाश्र्वभूमीवर शहराच्या कुठल्याही भागात आग लागली तर लवकरच पोहोचता यावे यासाठी पालिकेने अग्निशमन उपकेंद्रांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या उपकेंद्रांचे काम रखडले आहे.

वसई-विरार शहर झपाटय़ाने वाढत आहे. शहरातील लोकसंख्या २५ लाखांहून अधिक झालेली आहे. शहराच्या विविध भागांत दाटीवाटीने अनेक वसाहती उभ्या राहात आहेत. आगीची वर्दी (कॉल) मिळाल्यावर पहिल्या पाच मिनिटांत पोहोचणे आवश्यक असते. त्यासाठी अग्निशमन उपकेंद्रे पालिकेने तयार केली आहेत. पालिकेचे मुख्य अग्निशमन केंद्रे नालासोपारा पूर्वेच्या आचोळे येथे आहे. याशिवाय नालासोपारा (श्रीप्रस्थ) वसईला (सनसिटी), वसई (तामतलाव) वसई पूर्व (नवघर) विरार पश्चिम (बोळिंज) विरार पूर्व (फूलपाडा) अशी सहा उपकेंद्रे आहेत. पालिकेने एकूण १२ उपकेंद्रे प्रस्तावित केली होती. त्यापैकी मुख्यालयासह सहा उपकेंद्रे तयार झाली आहेत. नालासोपाऱ्यातील पेल्हार, वसई पूर्वेच्या वालीव, विरारमधील बोळिंज, नवघर पूर्व, वसई गावातील जीजी महाविद्यालयाजवळ आणि नायगावच्या उमेळा आणखी ६ अत्याधुनिक उपकेंद्रे प्रस्तावित आहेत. मात्र या उपकेंद्राच्या कामाला सुरुवात झालेली नाही.

Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
“त्याला अशी शिक्षा…”, नेहाचा खून करणाऱ्या फयाजच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
BJP and TMC
पश्चिम बंगालमध्ये टीएमसी अन् भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये मतदानावेळी राडा; एकजण गंभीर जखमी
Shanthappa Jademmanavar PSI
आईच्या मजुरीचं पांग फेडलंस! UPSC मध्ये सात वेळा नापास झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाची यशाला गवसणी
Dhokli village, Illegal building Dhokli village,
कल्याणमध्ये ढोकळी गावात शाळेच्या आरक्षणावरील बेकायदा इमारत जमीनदोस्त, आय प्रभागाची कारवाई

शहरातील १२ प्रस्तावित उपकेंद्रे तयार करण्याबरोबरच आणखी नवीन उपकेंद्रे तयार केली जाणार होती. दाटीवाटीने वसाहती आणि लोकसंख्या असलेल्या भागात ही अग्निशमन उपकेंद्रे तयार केली जाणार आहेत.

 महामार्गालगत मोठय़ा औद्योगिक आणि निवासी वसाहती तयार होत आहेत. त्या भागात एखादे उपकेंद्रे तयार करण्यात येणार होती. मात्र या उपकेंद्रांचे काम सुरू झालेले नाही. आम्ही अग्निशमन उपकेंद्रे तयार करण्याचा प्रस्ताव बांधकाम विभागाकडे दिला आहे, अशी माहिती अग्निशमन प्रमुख दिलीप पालाव यांनी दिली. तर अग्निशमन उपकेंद्रे का रखडली त्याबाबतची माहिती घेतली जाईल, असे पालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांनी सांगितले.

आगीच्या वाढत्या घटना

२०२० मध्ये शहरात ६५९ आगीच्या घटना तर २०२१ मध्ये आगीच्या ६४१ इतक्या घटना घडल्या होत्या. या लागलेल्या आगीच्या घटना विशेष करून औद्योगिक वसाहती, गोदामे या ठिकाणच्या भागात अधिक प्रमाणात घडल्या आहेत. तसेच आगीच्या घटनांसह इतर ही घटना शहरात यात रस्त्यावर ऑइल गळती होण्याच्या ३७ घटना घडल्या आहेत. तर १० घरगुती गॅस गळती, वादळीवाऱ्यामुळे शहरात ९८४ ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.