अग्निशमन दलाच्या जवानांनी वाचविले तरुणीचे प्राण

नालासोपारा पश्चिमेच्या रिलाईबल हाईट्स या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून तोल जाऊन  चौथ्या मजल्यावर अडकून पडलेल्या २१ वर्षीय तरुणीचे अग्निशमन दलाच्या जवानांनी प्राण वाचविले आहेत.

अग्निशमन दलाच्या जवानांनी वाचविले तरुणीचे प्राण
अग्निशमन दलाच्या जवानांनी वाचविले तरुणीचे प्राण

वसई: नालासोपारा पश्चिमेच्या रिलाईबल हाईट्स या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून तोल जाऊन  चौथ्या मजल्यावर अडकून पडलेल्या २१ वर्षीय तरुणीचे अग्निशमन दलाच्या जवानांनी प्राण वाचविले आहेत. शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

नालासोपारा पश्चिमेला रिलाईबल हाईट्स इमारत आहे. या इमारतीमध्ये शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास २१ वर्षीय तरुणीचा पाचव्या मजल्यावरून तोल गेला आणि सुदैवाने ती चौथ्या मजल्यावरील ग्रील ला अडकून होती. स्थानकांनी याची माहिती पालिकेच्या अग्निशमन विभागाला दिली होती. अग्निशमन दलाचे जवान दाखल होईपर्यंत स्थानिक राहिवासीयांनी तिला पकडून ठेवले होते. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान दाखल होताच त्यांनी ग्रील कटरच्या साहाय्याने तोडून या तरुणीची सुटका केली आहे.झाकिया खान (२१ ) असे या वाचविण्यात आलेल्या तरुणीचे नाव असून तिला सुखरूप तिच्या कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कामगिरी श्रीप्रस्थ उपअग्निशन केंद्र नालासोपारा अग्निशमन दलाचे जवान मधुकर सोनावणे, युगेश पाटील, कृष्णा गरुड, सागर परब  यांनी केली आहे.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
पालिका चार ठिकाणी भव्य प्रवेशद्वार उभारणार-५ कोटी रुपयांचा खर्च
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी