scorecardresearch

Premium

वसई : इन्स्टाग्रामवर वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली महिलेची फसवणूक, ५ दिवसांत महिलेने गमावले चक्क १६ लाख रुपये

करोना काळात सुरू झालेली ‘वर्क फ्रॉम होम’ पद्धत सायबर ठकसेनांना चांगलीच पर्वणी ठरली आहे. वर्क फ्रॉम होम अर्थात घरातून काम करून कमवा अशा भूलथापा मारून लोकांना गंडविण्याचे प्रकार वाढले आहेत.

Fraud with a woman on Instagram
वसई : इन्स्टाग्रामवर वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली महिलेची फसवणूक, ५ दिवसांत महिलेने गमावले चक्क १६ लाख रुपये (प्रातिनिधिक छायाचित्र)

वसई- करोना काळात सुरू झालेली ‘वर्क फ्रॉम होम’ पद्धत सायबर ठकसेनांना चांगलीच पर्वणी ठरली आहे. वर्क फ्रॉम होम अर्थात घरातून काम करून कमवा अशा भूलथापा मारून लोकांना गंडविण्याचे प्रकार वाढले आहेत. विरारमध्ये राहणार्‍या एका महिलेला अशीच भूलथाप मारून १६ लाखांना गंडा घातला आहे.

या प्रकरणातील ४६ वर्षीय महिला ही विरार पश्चिमेला राहते. १८ नोव्हेंबर रोजी तिने इन्स्टाग्राम या समाजमाध्यमावर एक जाहिरात पाहिली होती. घर बसल्या काम करा (वर्क फ्रॉम होम) आणि महिन्याला हजारो रुपये कमवा अशी ती जाहिरात होती. मात्र ती जाहिरात फसवी असल्याचे फिर्यादी महिलेला समजले नाही. तिने जाहिरातीला क्लिक केल्यानंततर ४ वेगवेगळ्या इन्स्टाग्राम आयडीच्या लोकांनी तिच्याशी मेसेजेसद्वारे संपर्क केला. टेलिग्रामवरील टास्क पूर्ण केल्यानंतर तुम्हाला भरपूर पैसे मिळतील असे सांगितले. फिर्यादी महिला या भूलथापांना बळी पडली. आरोपींच्या सांगण्यानुसार ती टास्क पूर्ण करत गेली आणि त्यासाठी विविध शुल्क भरत गेली. १८ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर या पाच दिवसांत महिलेने तब्बल १५ लाख ९६ हजार रुपये सायबर ठकसेनांना पाठवले. मात्र तिला कसलाच परतावा मिळाला नाही. उलट तिने भरलेल्या सुमारे १६ लाख रुपयांपैकी एकही रुपया मिळाला नाही. यानंतर सर्व आयडी बंद झाले.

Sony Group explores new opportunities after parting ways with Zee
‘झी’शी फारकतीनंतर सोनी समूहाकडून नवीन संधींचा शोध
do Vyaghrasana know its health benefits
Vyaghrasana Yoga : तासन् तास बसून काम करत असल्यामुळे पाठदुखी व कंबरदुखीचा त्रास वाढलाय? मग व्याघ्रासन योगा करा
king charles cancer diagnosis
किंग चार्ल्स यांना कर्करोग झाल्यानं आता ब्रिटनच्या राजगादीचे काय होणार? वाचा सविस्तर
gang cheated old man for rs 22 lakhs In the name of share trading
सावधान : शेअर ट्रेडिंगच्या नावावर लोकांना लुटणारी टोळी सक्रिय, वृद्धाची २२ लाखाने फसवणूक

हेही वाचा – वसई : बेपत्ता शाळकरी मुलीचा मृतदेह आढळला

हेही वाचा – वसई : रुग्णालयांमध्ये रुग्णांची सनद ऐवजी रुग्णांना इशारा देणारे फलक

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या महिलेने सोमवारी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी ४ जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. नागरिकांनी कुठल्याही भूलथापांना बळी पडू नये. अधिकृत कंपन्यांच्या संकेतस्थळांशीच व्यवहार करावा. त्याआधी खात्री करून घ्यावी अशी माहिती सायबर गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुजित गुंजकर यांनी दिली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Fraud with a woman in the name of work from home on instagram in 5 days the woman lost rs 16 lakhs ssb

First published on: 05-12-2023 at 13:46 IST

आजचा ई-पेपर : वसई विरार

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×