विरार  : विरार पूर्व येथील मनवेल पाडा परिसरात संत नगर येथील सात ते आठ दुकानांना शुक्रवारी मध्य रात्री 12 च्या सुमारास अचानक आग लागली. लागडी फर्निचर आणि कापसाच्या गाद्या असल्याने काही क्षणात आगीने लोन सर्वत्र पसरले आणि सर्व दुकानें जळून खाक झाली. सदरची दुकाने ही रस्त्याच्या कडेला  रहिवाशी इमारती पासून काही अंतरावर असल्याने मोठी दुर्घटना टळली. वसई विरार महानगर पालिका अग्निशन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवार नियंत्रण मिळवण्याचे काम सूरू केले आहे. एकूण 30 जवान आणि 4 पाण्याचे बंब घटनास्थळी आग विझविण्याचे काम करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार सदरची दुकाने बेकायदेशीर असून या ठिकाणी अग्नीसुरक्षा रोधक कोणत्याही यंत्रणा नव्हत्या. यामुळे आग विझविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.  प्रथमदर्शी सदरची आग ही शॉक सर्किट ने लागली असल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली आहे. सदरच्या दुकानात कुणी मजूर अथवा कारागीर राहत नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण लाखो रुपयाची वित्तहानी झाल्याचे समाजात आहे.