वसई: विरार पूर्वेच्या टोटाळे तलावात गणेश विसर्जनासाठी गेलेल्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. अमित मोहिते (२४) असे या तरुणाचे नाव असून बुधवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली.

अमित मोहिते हा विरार पूर्वेच्या फुलपाडा परिसरात राहत आहे. मंगळवारी अनंत चतुर्थीच्या दिवशी गणेश विसर्जनासाठी गेला होता. विसर्जन मिरवणुक ही बुधवारी सकाळी पहाटे पर्यंत सुरू होती.  यावेळी अमित हा विसर्जनासाठी विरारच्या टोटाळे तलावात उतरला होता.

याच वेळी अमित याला फिट आली आणि तो पाण्यात पडला. याच दरम्यान त्याचा मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने त्याचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.