वसई– नालासोपार्‍यात आणखी एक सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. १६ वर्षाच्या मुलीवर तिच्या वर्गमित्रासह दोघांना धमकावून बलात्कार केला तसेच तिची अश्लील छायाचित्रे काढून तिला धमकावले आहे. याप्रकरणी नालासोपारा पोलिसांनी दोन विधीसंघर्षित (अल्पवयीन) मुलांवर सामूहिक बलात्कार आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पीडित मुलगी १६ वर्षांची आहे. ऑगस्ट महिन्यात तिचा १६ वर्षांचा वर्ग मित्र तिला निळेमोरे येथील एका मित्राच्या घरी घेऊन गेला होता. तेथे तिला फूस लावून त्या दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर दोघांनी पुन्हा तिला धमकावून निळेमोरे येथे बोलावून तिच्यावर बलात्कार केला. यावेळी एका आरोपीने त्यांच्या संबंधाचे चित्रिकरण केले. या चित्रिकरणाच्या आधारे दोन्ही तिला धमकावत होते. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यातील एक आरोपी १६ तर दुसरा आरोपी १७ वर्षांचा आहे. त्यांच्या विरोधात नालासोपारा पोलिसांनी सामूहिक बलात्कार आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.