scorecardresearch

खाद्यपदार्थ विक्रेत्याकडील सिलिंडरमधून गॅस गळती

रविवारी भाईंदर येथील रस्त्यावर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या विक्रेत्याच्या गॅस सिलिंडरमधून गळती झाली.

सुदैवाने अनर्थ टळला

भाईंदर :  रविवारी भाईंदर येथील रस्त्यावर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या विक्रेत्याच्या गॅस सिलिंडरमधून गळती झाली. मात्र अग्निशन  विभागाने वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणल्याने पुढील अनर्थ टळला. मीरा-भाईंदर शहरात रस्त्यावर गॅस सिलिंडरचा वापर करण्यावर बंदी असतानादेखील रस्त्यावर उघडपणे सिलिंडरचा वापर होत आहे.

भाईंदर पूर्व येथील इंद्र लोक चौकात अनमोल बेकरीबाहेर फुटपाथवर सिलिंडरचा वापर करून खाद्यविक्री करणाऱ्या विक्रेत्याच्या सिलिंडरमधून रविवारी संध्याकाळी गॅस गळती झाल्याची घटना घडली. या वेळी अवतीभवतीदेखील अनेक खाद्य विक्रेते असल्यामुळे मोठा स्फोट होण्याची भीती नागरिकांमध्ये पसरली. त्यामुळे घटनास्थळी तात्काळ अग्निशमन विभागाने व स्थानिक पोलीस प्रशासनाने धाव घेऊन परिस्थिती आटोक्यात आणली. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोका निर्माण केल्याअंतर्गत नवघर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली असल्याची माहिती नवघर पोलीस ठाण्याचे गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक प्रकाश म्हसाळ यांनी दिली. चार वर्षांपूर्वी पालिकेच्या महासभेत उघडय़ावर सिलिंडरच्या वापरावर बंदी घालण्याचा निर्णय पालिकेने मंजूर केला होता. मात्र बंदी असूनही अद्याप शहरातील मोकळय़ा मैदानात, बाजारात आणि दुकानांबाहेरील परिसरात सर्रास सिलिंडरचा वापर करून खाद्यविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचे दिसून येत आहे.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gas leak cylinder food vendor ysh

ताज्या बातम्या