|| नितीन बोंबाडे

डहाणू: डहाणू तालुक्यातील तवा या आदिवासी दुर्गम भागात बचत गटाच्या होतकरू महिला आणि शेतकरी हितवर्धक संस्था यांच्या प्रयत्नाने गोधडी प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पात १२ बचत गट काम करीत आहेत. महिला सक्षमीकरणासाठी हा प्रकल्प आधारभूत ठरत आहे. तयार होणाऱ्यांपैकी काही गोधड्या या गरजूंना मोफत देण्यात येत असून या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

trees cut, Metro-3,
मेट्रो-३ प्रकल्पासाठी तोडलेल्या झाडांच्या पुनर्रोपणाचे प्रकरण : कामातील प्रामाणिकपणावर उच्च न्यायालयाच्या विशेष समितीचे बोट
Farmers, Farmers news,
प्रकल्प घोषणेपूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे
Northwest Mumbai beautification of Jogeshwari Caves is sometimes under construction awaiting rehabilitation
आमचा प्रश्न : वायव्य मुंबई – जोगेश्वरी गुंफेचे सुशोभीकरण कधी प्रकल्पबाधितही पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत
Vartaknagar Police Colony
प्रकल्प खर्च वसुलीसाठी गृहबांधणीऐवजी भूखंडविक्री, वर्तकनगर पोलीस वसाहत पुनर्विकास; ४०० कोटी अपेक्षित

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील तवा या दुर्गम गावात शेतकरी हितरक्षक संस्था आणि बचत गट यांचा गोधडी प्रकल्प सुरू करण्याची कल्पना मांडली.

तवा येथील साई मंदिरात या प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली असून अल्पावधीतच त्याला चांगला प्रतिसाद लाभला आहे. दिवसाला हातशिलाईने ५० हून अधिक गोधड्या तयार केल्या जात आहेत. साड्या, चादरी आणि ओढण्या घेऊन त्यापासून नाममात्र दरात गोधडी शिवून देण्यात येत आहेत.

बचत गटाने गावातील ग्रामस्थांना सहभागी केल्याने महिलांच्या सक्षमीकरणाला हातभार लागला आहे. यातून शंभर महिलांना काम मिळाले आहे. गोधडीसाठी साड्या तसेच साहित्य पारसमणी बंगला, साईमंदिर समोरच्या टेकडीवर, तवा, तालुका डहाणू येथे जमा करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सध्या हात शिलाईने गोधडी शिवल्या जात आहेत. चार महिला मिळून या गोधड्या शिवतात. गोधडी शिवण्याच्या मशीन मुबलक नसल्याने गोधडी उत्पादनाचा वेग कमी आहे. येत्या काही दिवसांत शिलाई मशीनची संख्या वाढवून अधिक जास्त गोधड्या शिवण्यात येतील, असे शेतकरी हितवर्धक संघाचे विजय वझे यांनी बोलताना सांगितले.

काय आहे हा प्रकल्प

तवा येथील गोधडी प्रकल्पात घरगुती नको असलेल्या साड्या, ओढण्या, चादरी स्वीकारल्या जातात. दानशूर व्यक्तींनी दिलेल्या या साहित्यातून गरीब गरजूंसाठी या गोधड्या तयार केल्या जातात. हातशिलाईने या गोधड्या शिवल्या जात असून दिवसाला ५० हून अधिक गोधड्या तयार होतात. नाममात्र शिलाई आणि अन्य खर्च घेऊन कायमच्या आठवणी जपणारी सुंदर गोधडी शिवून देण्यात येते. शिलाईचा खर्च मदत म्हणून स्वीकारला जातो. तर त्याची नाममात्र दराने विक्रीही केली जाते.

महिला सक्षमीकरणासाठी दुर्गम भागातून गोधडी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, तयार गोधड्यांना बाजारपेठ आणि विक्री व्यवस्था या दोन गोष्टींची जोड मिळाल्यास हा प्रकल्प आम्ही यशस्वी करून दाखवू – स्मिता विजय वझे, सचिव,  महिला बचत गट