gujarat assembly elections liquor from mumbai for elections in gujarat zws 70 | Loksatta

गुजरात राज्यातील निवडणुकीसाठी मुंबईतून मद्य; लक्झरी बसमधून तस्करी, ५ जणांना अटक

आरोपींवर महाराष्ट्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

गुजरात राज्यातील निवडणुकीसाठी मुंबईतून मद्य; लक्झरी बसमधून तस्करी, ५ जणांना अटक
भरारी पथकाने ५ जणांना अटक केली असून बनावट मद्याचा मोठा साठा जप्त केला आहे.

वसई : गुजरात राज्यातील निवडणुकीसाठी मुंबईतून होणारी मद्यतस्करी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने उघडकीस आणली आहे. मुंबईहून गुजरातला जाणाऱ्या आरामदायी प्रवासी बसमधून ही तस्करी केली जात होती. याप्रकरणी भरारी पथकाने ५ जणांना अटक केली असून बनावट मद्याचा मोठा साठा जप्त केला आहे.

सध्या गुजरात राज्यात विधानसभा निवडणुका सुरू झाल्या आहेत. त्यासाठी मुंबईवरून मद्य चोरटय़ा मार्गाने नेले जात असल्याची माहिती पालघरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार गुरूवारी पथकाने महामार्गावरील काशिद कोपर गावाजवळ वेस्टर्न हॉटेल समोर सापळा लावला होता. यावेळी टाटा एस कंपनीचा टेंम्पो (एमएच ४८ बीएस ३०६५) मधून ३ इसम सिफात टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स या स्लीपरी लक्झरी बस मध्ये (जीजे ८ एयू ५०५२) मद्य लपवलत असलेले आढळले. पथकाने केलेल्या कारवाईत २४ खोके जप्त करण्यात आले. त्यात २१६ विदेश मद्याच्या बाटल्या होत्या. मद्याची लेबल बदलण्यात आली होती.

याप्रकरणी टेम्पोचालक दिलीप मिश्रा (४०) मद्यसाठा पुरवणारा  प्रदीप पिल्ले (४१) बस चालक अब्दुल सलाम नेदरिया (४३) तसेच सचिन मिश्रा (४१) आणि यासिफ खान बिहारी यांना अटक करम्ण्यात आली. ट्रान्सपोर्ट बसचा मालक ताहिर पलसानिया हा फरार आहे. या कारवाईत मद्यसाठा आणि वाहने मिळून एकूण ३९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींवर महाराष्ट्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2022 at 03:04 IST
Next Story
महागाई आणि गुंतवणुकीची सांगड घालणारे वित्तव्यवस्थापन गरजेचेच!