पर्यटनाला चालना देण्यासाठी महापालिकेचा उपक्रम

भाईंदर :- मीरा-भाईंदर शहरातील ऐतिहासिक किल्ले, पुरातन मंदिरे आणि  विविध पर्यटनस्थळांचा आनंद आता नागरिकांना सहज घेता येणार आहे. ही सर्व पर्यटन स्थळे पाहण्यासाठी पालिकेने ‘हेरिटेज वॉक’ हा उपक्रम सुरू केला आहे. परिवहन सेवेच्या खास बसेसमधून नागरिकांना ही सर्व स्थळे पाहता येणार आहे. यामुळे पर्यटनाला चालना मिळणार असून पालिकेनेदेखील शहराला पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मुंबईला लागून असलेल्या मीरा भाईंदर शहराच्या पश्चिमेला उत्तन सारखा निसर्गरम्य परिसर आणि विशाल समुद्र किनारा लाभला आहे. शहरात घोडबंदर किल्ला तसेच जंजिरे धारावी किल्ला तसेच पोर्तुगीजकालीन चर्चेस, पुरातन धार्मिक स्थळे असा ऐतिहासिक वारसा  देखील लाभला आहे. गेल्या काही वर्षांपासून शहराचा झपाटय़ाने झालेल्या विकासामुळे अनेक अत्याधुनिक वास्तूची देखील निर्मिती पालिकेकडून करण्यात येत आहे. यात भव्य असे बुद्ध विहार, बाळासाहेब ठाकरे कलादालन, नाटय़गृह, प्रमोद महाजन हॉल, जैव विविधता उद्यान, तरण तलाव, व शहरातील  उद्यानाचा समावेश आहे. शहराला पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्यासाठी पालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी पुढाकार घेतला आहे.

Shri Ram Navami, Celebration in Shegaon, Grandeur and Devotion, gajanan maharaj shegaon, ram navami 2024, ram navami celebration in shegaon, ram navami,
‘श्रीराम नवमी’निमित्त ६७० दिंड्या दाखल, शेगावनगरी भाविकांनी फुलली
Traffic restrictions in Muktidham Kalaram Mandir area on the occasion of Ram Navami
रामनवमीनिमित्त मुक्तीधाम, काळाराम मंदिर परिसरात वाहतुकीवर निर्बंध
This pictorial story of Lalbagh Botanic Garden during both Bangalore and Bangalore eras
निर्जळगावातलं निसर्गबेट
Ajit Pawar appeal to the wrestlers of the district regarding the dispute in the wrestling federation pune
अजित पवार यांचा पैलवानांना ‘खुराक’; जिल्ह्यातील चारही मतदारसंघांसाठी मदत करण्याचे आवाहन

शहरातील ऐतिहासिक घोडबंदर किल्ला व जंजिरे धारावी किल्ला आहे.याच शिवाय वेलंकनी  समुद्र किनारा आणि अनेक  प्रसिद्ध मंदिर व वास्तू आहे.या सर्व गोष्टी नागरिकांना एकाच दिवशी पाहता याव्या याकरिता पालिकेकडून एक दिवसीय ‘हेरिटेज वॉक’ ही संकल्पना राबविलेली जाणार आहे. याकरिता पालिकेच्या मालकीच्या असलेल्या परिवहन बस गाडय़ांचा वापर करण्यात येणार आहे. या गाडय़ांना शहरातील पर्यटन स्थळांच्या  छायाचित्राने  सजावले जाणार असून नागरिकांना अवघ्या एका दिवसात शहरातील प्रमुख पर्यटक स्थळे पाहणे शक्य होणार आहे. सध्या या संदर्भात आकारण्यात येणाऱ्या शुल्कपासून इतर प्रमुख गोष्टीचा अभ्यास सुरू असून लवकरच  ‘हेरिटेज वॉक’ ही संकल्पना नागरिकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती उपायुक्त संजय शिंदे यांनी दिली.

 शहरातला लाभलेला नैसर्गिक वारसा, ऐतिहासिक वास्तू यांच्याबरोबर शहरातील पर्यटनासाठी सौंदर्यस्थळे विकसित करण्यात येत आहे. यामुळे पर्यटक शहरात येतील आणि शहराच्या पर्यटन व्यवसायाला चालना मिळणार आहे. यासाठी आयुक्त दिलीप ढोले आणि महौपार ज्योत्स्ना हसनाळे यांनी शहराची पाहणी करून पर्यटनासाठी विकसित केल्या जाणाऱ्या स्थळांचा आढावा घेतला .

मीरा-भाईंदर शहरला स्वच्छ आणि सुंदर शहर बनविण्याबरोबरच पर्यटनास्थळ म्हणून विकसित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. हेरिटेज वॉक ही संकल्पना त्यातूनच तयार झाली. आम्ही शहरात यापूर्वीच सेल्फी पॉइंट तयार केले आहेत. शहराच्या नैसर्गिक आणि ऐतिहासिक वास्तूंचा आनंद हेरिटेज वॉकच्या माध्यमातून पर्यटक आणि अभ्यासकांना घेता येणार आहे. 

-दिलीप ढोले, आयुक्त, मीरा-भाईंदर महापालिका