scorecardresearch

वसई विरार शहरात फटाक्यांची बेकायदेशीर दुकाने

वसई विरार शहरात ठिकठिकाणी विनापरवाना फटाके विक्रीची दुकाने सुरू आहेत. अशा विक्रेत्यांविरोधात पोलिसांनी मोहीम उघडली आहे.

Illegal firecracker shops in Vasai Virar city
२० हून अधिक विक्रेत्यांविरोधात गुन्हे दाखल (फोटो- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

वसई- वसई विरार शहरात ठिकठिकाणी विनापरवाना फटाके विक्रीची दुकाने सुरू आहेत. अशा विक्रेत्यांविरोधात पोलिसांनी मोहीम उघडली आहे. मंगळवारी विविध पोलीस ठाण्यात तब्बल २० विक्रेत्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Fasting Nirbhay Bano
कल्याणमध्ये महावितरणकडून बेकायदा बांधकामांना वीज पुरवठा, निर्भय बनोच्या पदाधिकाऱ्यांचे उपोषण
MCOCA against gang robbing passengers old Mumbai-Pune road
जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावर प्रवाशांना लुबाडणाऱ्या टोळीविरुद्ध ‘मोक्का’
Six people arrested sex racket case nagpur
लॉजमध्ये देहव्यापार, चार ग्राहक सापडले ‘नको त्या अवस्थेत…’
libiya flood
लिबियाच्या महाप्रलयकारी पुरात ५ हजार नागरिकांचा मृत्यू? रस्त्यांवर मृतदेहांचा खच, समुद्रातही बचावकार्य सुरू!

दिवाळीच्या काळात फटाके विक्री करण्यासाठी तात्पुरता स्वरूपात परवानगी व ना हरकत प्रमाणपत्र घेणे गरजेचे असते. याशिवाय अग्निसुरक्षेच्या दृष्टीने अग्निशमन विभागाची परवानगी घ्यावी लागते. वसई विरार महापालिकेने ९ प्रभागात २०५ फटाके विक्रेत्यांना परवानगी दिलेली आहे. मात्र तरी सुध्दा विनापरवाने बेकायेदशीरपणे फटाके विक्रीची दुकाने जागोजागी थाटण्यात आली आहे.शहरात विविध ठिकाणच्या रस्त्यावर, फुटपाथ, रस्त्याच्या कडेला दुकाने उभारली आहेत. काही विक्रेत्यांनी कोणत्याही प्रकारची परवानगी न घेताच ही दुकाने उभारली आहेत. तर दुसरीकडे वाहतुकीला अडसर होऊ नये, याची खबरदारी घेतली गेलेली नाही. त्यामुळे अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र आहे. विक्रेत्यांकडून आगप्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी होत नसल्याने या ठिकाणी आग लागल्यास मोठी दुर्घटना होऊ शकते.

आणखी वाचा-अपुर्‍या जागेमुळे नायगाव पोलीस ठाण्याचा विस्तार कंटेनरमध्ये!

यामुळे पोलिसांनी अशा विक्रेत्यांविरोधात कारवाई करून गुन्हे दाखल करण्यास सुरवात केली आहे. मंगळवारी एकूण २० विक्रेत्यांविरोधात कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात आले. सार्वजनिक रस्त्यालगत रहदारीस अडथळा निर्माण होऊन असे फटाक्याचे स्टॉल लावणे तसेच स्फोटक पदार्थ विक्री केल्याप्रकऱणी कलम १८८, २८३, २८६ सह स्फोटक पदार्थ अधिनियम १९८४ च्या कलम ९(ब) महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३३, एच १३१ अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. त्यामध्ये वालीव ३, तुळींज २, माणिकपूर १, नायगाव ५,वसई २, नयानगर ४, वसई २ आणि आचोळे पोलीस ठाण्यात ३ गुन्हे दाखल आहे. सोमवारी देखील माणिकपूर पोलीस ठाण्यात २ गुन्हे दाखल करण्यात आले होते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Illegal firecracker shops in vasai virar city mrj

First published on: 16-11-2023 at 15:40 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×