वसई: वसई, विरार शहरात फेरीवाल्यांची संख्या प्रचंड वाढत असताना पालिकेने केलेल्या सर्वेक्षणात केवळ शहरात १५ हजार १५६ इतकेच फेरीवाल्यांची नोंद करण्यात आली आहे. फेरीवाले रस्त्यावर, पदपथावर वाट अडवून बसत असल्याने वाहतूक व ये-जा करण्यास अडचणी निर्माण होतात. मात्र फेरीवाले बेसुमार असताना १५ हजारच फेरीवाले कसे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शहरात मुख्य रस्ते, ये-जा करण्याचे मार्ग, छोट्या गल्ल्या, पदपथ जिथे जागा मिळेल तिथे फेरीवाले बस्तान मांडून आहेत. नागरिकांना वाहतूक कोंडी, ये जा करण्याच्या मार्गात अडथळे अशा विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. फेरीवाल्यांची समस्या लक्षात घेता त्यातून तोडगा काढण्यासाठी व फेरीवाले बसण्यासाठीची जागा निश्चित करण्यासाठी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या अध्यक्षतेखाली पथविक्रेता समितीची बैठक पार पडली होती. यात नऊ प्रभागात सर्वेक्षण करण्यात आलेल्या फेरीवाल्यांची यादी प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेऊन ती यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

transformer Failure Mahapareshan,
महापारेषणच्या ५० एमव्हीए रोहित्रात बिघाड, वसई विरारमधील वीज पुरवठ्यावर परिणाम
2nd October Rashi Bhavishya & Panchang
२ ऑक्टोबर पंचांग: सर्वपित्री अमावस्या कोणासाठी ठरणार शुभ?…
online gambling, youth suicide Virar,
ऑनलाईन जुगारात कर्जबाजारी, गुजरातमधील तरुणाची विरारमध्ये आत्महत्या
Naigaon police, Naigaon police saved women,
वसई : नायगाव पोलिसांचे १५ दिवसातील कौतुकास्पद कार्य, आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या तीन महिलांचे वाचवले प्राण
ganesha devotee drowned in the lake during immersion at virar
विसर्जना दरम्यान गणेशभक्ताचा तलावात बुडून मृत्यू ; विरार येथील घटना
Delay to Veterinary Hospital in Vasai Virar
वसई-विरारमधील पशुवैद्याकीय रुग्णालयाला विलंब
Gang rape with married woman at knife point
नालासोपार्‍यात सामूहिक बलात्काराची चौथी घटना, चाकूचा धाक दाखवून विवाहितेवर सामूहिक बलात्कार
Kirit Somaiya
Kirit Somaiya : “मला न विचारताच घोषणा”, किरीट सोमय्यांनी भाजपाचा आदेश धुडकावला; म्हणाले, “पुन्हा अशी वागणूक…”

हेही वाचा – विसर्जना दरम्यान गणेशभक्ताचा तलावात बुडून मृत्यू ; विरार येथील घटना

फेरीवाल्यांचे बायोमेट्रिक पद्धतीने सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात शहरात केवळ १५ हजार १५६ फेरीवाल्यांची नोंदणी करण्यात आली असल्याचे पालिकेने सांगितले आहे. या सर्वेक्षणानंतर फेरीवाला धोरण, बसण्यासाठीच्या जागा, ना फेरीवाला क्षेत्र, नोंदणी प्रमाणपत्र या सर्व बाबी पूर्ण केल्या जातील असे महापालिकेने सांगितले आहे. मात्र शहरात फेरीवाल्यांची संख्या बेसुमार वाढली असताना पालिकेच्या दप्तरी केवळ १५ हजारच फेरीवाल्यांच्या नोंदी असल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

हरकती व सूचना नोंदविण्यासाठी मुदत

नोंदणीकृत पथविक्रेत्यांची यादी महानगरपालिकेच्या नऊ प्रभाग समिती कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीमधील तपशीलाबाबत नागरिकांना सूचना व हरकती नोंदविण्यात येणार आहेत. याची अंतिम मुदत  ३० सप्टेंबर असून नागरिकांना आपल्या सूचना व हरकती संबंधित प्रभाग समिती कार्यालयांमध्ये कार्यालयीन वेळेत लेखी स्वरुपात देता येणार आहेत.

वाढत्या फेरीवाल्यांमुळे नागरिकांची कोंडी कायम 

वसई विरारमध्ये फेरीवाल्यांची संख्या वाढतच आहे. विशेषतः ठिकठिकाणी नियमबाह्य पद्धतीने भरविल्या जात असलेल्या बाजारांमुळे शहरात वाहतूक कोंडी, अस्वच्छता, रोगराई, प्रदूषण इत्यादी समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. याशिवाय ये जा करण्याचे रस्ते, फुटपाथ ही गिळंकृत झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना ये जा करण्यास अडचणी निर्माण होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. आधीच अपुरे रस्ते व जागा त्यात वाढते फेरीवाले यामुळे नागरिकांची कोंडी कायम राहणार आहे अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे.

हेही वाचा – भाईंदर : अखेर वादात अडकलेल्या ‘उत्तर भारतीय भवनाच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम संपन्न

फेरीवाल्यांचे पुनवर्सन

वसई विरार शहरात फेरीवाले मुख्य रस्ते, फुटपाथ, नाले अशा ठिकाणी बसत आहेत. त्यामुळे वाहतूक समस्येसह नागरिकांना ये जा करण्यास अडचणी येत आहेत. ही समस्या सुटावी यासाठी नगररचना विभागाच्या मदतीने फेरीवाला झोन तयार करून फेरीवाल्यांना विशिष्ट जागा उपलब्ध करून त्यांचे पुनर्वसन केले जाणार आहे असे सहायक आयुक्त सुखदेव दरवेशी यांनी सांगितले आहे. याशिवाय जी गर्दीची ठिकाणे आहेत त्या ठिकाणी ना फेरीवाले क्षेत्र घोषित केले जाणार आहे. त्यामुळे फेरीवाल्यांची अडसर दूर होऊन नागरिकांना मोकळे रस्ते मिळतील असे दरवेशी यांनी सांगितले आहे.