भाईंदर : लग्न मोडल्याने निराश झालेल्या तरुणीने नव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना मिरा रोड मध्ये घडली आहे. नर्गिस मलिक (२०) असे मयत तरुणीचे नाव आहे. ती मिरा रोड येथीलअविंगा कॉम्प्लेक्समधील ९ व्या मजल्यावर रहात होती. नर्गिसचे पिंटू नामक तरुणाशी लग्न जमले होते. दरम्यान, नर्गिसचे अन्य तरुणाशी प्रेमसंबंध असल्याची माहिती पिंटूला मिळाली. त्यामुळे त्याने नर्गिसशी वाद घातला आणि लग्न करू शकत नसल्याचे सांगितले. यामुळे नर्गिस मानसिक तणावात होती. तिच्या कुटुंबियांनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला  होता. मात्र रात्री साडे नऊच्या सुमारास किचनच्या खिडकीमधून तिने थेट खाली उडी मारली.

हेही वाचा : राष्ट्रीय महामार्गावर रस्ता खचला, ससूनवघर जवळील घटना; गाड्या पडल्या अडकून पडल्याने प्रचंड वाहतूक कोंडी

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In bhaindar young woman commits suicide after breaking up her marriage jumps from 9th floor css
First published on: 09-06-2024 at 22:37 IST