लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
वसई : क्षुल्लक कारणांवरून खासगी शिकवणी घेणार्या शिक्षिकेने १० वर्षाच्या मुलीच्या कानाखाली मारल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. तिच्या श्वसनलिकेसह मेंदूला ईजा झाली असून तिच्यावर मुंबईच्या खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. मागील ८ दिवसांपासून ती कृत्रिमश्वसनयंत्रणेवर (व्हेंटिलेटवर) मृत्यूशी झुंज देत आहे.
नालासोपारा पूर्वेच्या ओस्वाल नगरी येथील अंबाराम पटेल (३२) हे किराणा दुकान चालवतात. त्यांची १० वर्षांचा मुलगी दिपिका ५ व्या इयत्तेत शिकते. याच परिसरात असलेल्या रिना क्लासेसमध्ये दिपिका खासगी शिकवणीसाठी जाते. ५ ऑक्टोबर रोजी ती वर्गात मस्ती करत असल्याने शिकवणी घेणारी शिक्षिका रत्ना सिंग (२०) हिने दिपिकाच्या उजव्या कानाखाली हाताने जोरदार थप्पड मारली. यामुळे तिच्या कानातील कर्णफुलाचा मागील भाग कानाच्या पाठीमागील बाजूस लागून दुखापत झाली. या मारहाणीमुळे दिपिकाचे तोडं बंद झाले आणि कान सुजून दुखत होता. सुरवातीला तिला विरारच्या खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र दुखणे वाढल्याने तिला १३ ऑक्टोबर रोजी मुंबईच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
आणखी वाचा-अपहृत चिमुकल्याची ४ तासात सुखरूप सुटका; टिव्ही मालिकेतील अभिनेत्रीला अटक
दिपिका कृत्रिम श्वसनयंत्रणेवर उपचार
याबाबत दिपिकाचे वडील अंबाराम यांनी सांगितले की, माझ्या मुलीवर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार सुरू आहेत. ती कृत्रिम श्वसनयंत्रणेवर (व्हेंटिलेटर) आहे. तिला दिवसाला उपचाराचा २५ हजार खर्च आहे. आमची आर्थिक परिस्थिती नसल्याने आम्ही सामाजिक संस्थाकडे मदत मागत आहोत. माझ्या मुलीला मारहाण करणार्या शिक्षिकेवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.
या प्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात रत्ना सिंग विरोधात कलम १२५(अ) (ब) तसेच बाल न्याय मुलांची काळजी आणि संरक्षण) कायदाच्या अधिनिमय ७५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्ही संबंधिक शिक्षिकेला नोटीस पाठवली असून पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती तुळींज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विनोद वायंकरणकर यांनी दिली.