वसई: डॉक्टर असल्याचे भासवत दोन भामट्यांनी वसईतील काही महिलांना औषधांच्या नावाखाली गंडा घातला आहे. विशेष म्हणजे आशा सेविकांकडून त्यांनी ही माहिती मिळवली होती. याप्रकऱणी मांडवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसई तालुक्यात जिल्हा परिषदेची प्राथमिक आरोग्य केंद्रे (पीएससी) आहेत. या केंद्राच्या अंतर्गत आशा सेविका काम करतात. त्या घरोघरी जाऊन शासनाच्या आरोग्य मोहिमा राबवत असतात. २२ ते २४ ऑगस्ट दरम्यान दोन इसमांनी पारोळ, भाताणे आणि शिवणसई प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशासेविका महिलांची भेट घेतली. आम्ही जिल्हा परिषद पालघर येथील डॉक्टर असल्याचे त्यांनी या आशा सेविकांना सांगितले. शासनाकडून व्यंधत्वावर उपचारासाठी औषधे आणल्याचे सांगून व्यंधत्व असलेल्या महिलांची माहिती मागितली. या आशा सेविका त्यांच्या भूलथापांना बळी पडल्या आणि त्यांनी काही महिलांची माहिती दिली. या भामट्या डॉक्टरांनी अशा महिलांची भेट घेऊन त्यांना संतान संजीवनी कल्पवटी चूर्ण पुडी, संभोग सम्राट कल्पवटी चूर्ण नावाच्या पुड्या १८ हजार रुपयांना विकल्या. नंतर ते डॉक्टर नसून भामटे असल्याचे लक्षात आले.
वसई: भामट्यांनी डॉक्टर बनून महिलांना घातला गंडा, आशा सेविकांकडून घेतली माहिती
डॉक्टर असल्याचे भासवत दोन भामट्यांनी वसईतील काही महिलांना औषधांच्या नावाखाली गंडा घातला आहे.
Written by लोकसत्ता टीम
वसई
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 27-08-2024 at 23:56 IST
© The Indian Express (P) Ltd
© The Indian Express (P) Ltd
Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In vasai two persons claiming themselves as doctor cheated asha workers with fake medicine css