दुकानावरील चिकनच्या मागणीत प्रचंड घट

विरार : वसई-विरारमध्ये बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाल्याचा फटका स्थानिक चिकन व्यावसायिकांना बसला असून त्यांच्या दुकानावरील चिकनच्या मागणीत प्रचंड घट झाली आहे. दुसरीकडे पाकीटबंद चिकनच्या विक्रीत मात्र वाढ झाल्याचे दिसून येत आहे. दुकानातील चिकनची मागणी मोठय़ा जलद गतीने कमी झाली. दुकानासमोर लागणाऱ्या रांगा बंद झाल्या आहेत.  यामुळे त्यांचा सर्व माल मागील आठवडय़ापासून तसाच पडून आहे. त्यात कोंबडय़ांचे खाद्य आणि त्यांचे आरोग्य जपण्यात विक्रेत्यांची दमछाक होत आहे.  दुसरीकडे पाकीटबंद चिकन विकणाऱ्या कंपन्यांनी आपल्या जाहिराती वाढविल्या आहेत. त्यामुळे खवय्यांनी पाकीटबंद चिकनकडे मोर्चा वळविला आहे.  मागील आठवडाभरात विविध पाकीटबंद चिकनच्या मागणीत प्रचंड वाढ दिसून आली आहे.

PMC pune municipal corporation
रस्त्यावर फेकलेल्या कचऱ्यातून पत्ते शोधून दंडाची वसुली; मोटारीतून कचरा फेकणाऱ्यांचा पाठलाग करून महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कारवाई
Development Plan, Navi Mumbai, Wetlands, Residential Complexes, Political Silence, flamingo, environment,
नवी मुंबई : पाणथळीच्या जागा निवासी संकुलांसाठी खुल्या करण्याचा निर्णय, पर्यावरणप्रेमींचा विरोध, नेत्यांचे सोईस्कर मौन
house burglars
घरफोडी करणाऱ्या टोळीचे जाळे उद्ध्वस्त, हसन कुट्टीसह १० गुन्हेगार ताब्यात
meetings between ola uber companies and cab drivers
ओला, उबरचा तिढा सुटेना! कॅबचालक भाडेवाढीच्या मागणीवर ठाम; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीकडे लक्ष

यामुळे अनेक स्थानिक विक्रेत्यांनी सुद्धा ही पाकिटे विकण्यास सुरुवात केली आहे.  विरार मधील स्थानिक चिकन विक्रेते नावेद शेख यांनी माहिती दिली की, दर शनिवारी रविवारी ५० ते १०० कोंबडय़ांचे मांस विक्री केली जात होती. पण बर्ड फ्ल्यूची माहिती आल्यावर मागील आठवडय़ाभरापासून १० ते १२ कोंबडय़ांची  विक्री झाली आहे.  नागरिक येऊन पाकीट बंद चिकनची मागणी करत असल्याने नाईलाजाने पाकिटे ठेवावी लागत आहेत.

पाकीटबंद चिकनचे दर अधिक असले तरी त्यांचे विविध पर्याय उपलब्ध असल्याने नागरिकांच्या पसंतीला उतरत आहेत. त्यात त्याच्या गुणवत्तेचे प्रमाण सादर करून त्याच्या जाहिरातीचा भडिमार केला जात असल्याने नागरिक आकर्षिले जात असल्याचे नावेद यांनी सांगितले. त्यात मटणाच्या भावसुद्धा गगनाला भिडत आहेत. वसई-विरारमध्ये ६६० रुपये किलोने मटन विक्री होत आहे. तसेच मासे सुद्धा अधिक चढय़ा भावाने विक्री होत असल्याने स्वस्त आणि सुरक्षित म्हणून पाकीटबंद चिकनकडे पर्याय म्हणून पहिले जात आहे.   बर्ड फ्ल्यूमुळे चिकन खाण्यास भीती वाटत आहे, यामुळे आम्ही सध्या शाकाहारी जेवणाकडे कल दिला आहे. त्यात मटन आणि मासे परवडत नाहीत. पण तरीही काही वेळेस पाकीटबंद चिकन मागवत असतो, असे चंद्रकांत राणे या नागरिकाने सांगितले.