यांत्रिक पद्धतीने स्वच्छता, खासगी कर्मचाऱ्यांकडून काम करवून घेतल्यास गुन्हा दाखल होणार

वसई: शहरातील इमारतीची मैला टाकी आणि भुयारी मार्गांची सफाई केवळ पालिकेच्या प्रशिक्षित सफाई कर्मचाऱ्यांकडून यांत्रिक पद्धतीने केली जाणार आहे. खासगी कर्मचाऱ्यांकडून मैला टाकी साफ करण्यास प्रतिबंध घातला असून त्याचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल केला जाणार आहे. नागरिकांच्या सोयीसाठी पालिकेने प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली स्वत:ची यंत्रणा उभारली आहे.

Kandalvan, Kandalvan belt,
ज्वलनशील पदार्थांद्वारे कांदळवनावर घाला, सिडकोकडील २३० हेक्टर कांदळवन पट्टा हस्तांतरीत करण्यास टाळाटाळ कशासाठी ?
HC orders Mumbai Municipal Corporation to devise alternative policy for unlicensed hawkers
विनापरवाना फेरीवाल्यांसाठी पर्यायी धोरण आखा, उच्च न्यायालयाचे मुंबई महानगरपालिकेला आदेश
series of tremors Navi Mumbai
शहरात हादऱ्यांची मालिका सुरूच, नवी मुंबई महापालिका आयुक्तांच्या बदलीनंतर नगररचना विभागही सुस्त
pmp and rto taken joint action against 1620 errant rickshaw drivers
बसस्थानक परिसरात रिक्षा उभी करणाऱ्या १,६२० चालकांवर कारवाई, पीएमपी, आरटीओची मोहीम

भारतात इमारती आणि निवासस्थानांमधील मैला टाकी साफ करताना सफाई कर्मचारी टाकीत उतरत असतात. त्यांना कुठलेच सुरक्षेची साधने तसेच प्रशिक्षण नसते त्यामुळे अनेकांचा मृत्यू होत असतो. भारतात मैला टाकी तसेच गटारे साफ करताना तर तीन दिवसांत एका सफाई कर्मचार्म्याचा मृत्यू होत असतो. वसई—विरार शहरातही अशा घटना घडल्या आहेत. ते रोखण्यासाठी महापालिकेने कडक पावले उचलली आहेत. कुठल्याही खासगी इसमांकडून मानवी पद्धतीने मैला टाकी साफ करण्यास प्रतिंबध घालण्यात आला आहे. त्याचे उल्लंघन केल्यास सफाई कर्मचाऱ्यांच्या सफाई मित्र पुर्नवसन अधिनियम २०१३ नुसार कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

निवासी आणि व्यावसायिक संकुलातील मैला टाकी साफ करण्यासाठी पालिकेने स्वत:ची यंत्रणा उभारली आहे. यासाठी पालिकेने सर्व ९ प्रभागांसाठी प्रत्येकी एक स्वयंचलित मैला टाकी वाहन  आणि संक्शन पंप आणले आहेत. प्रत्येक वाहनात ४ प्रशिक्षित सफाई कर्मचारी तैनात केलेले असतात. नागरिकांनी मागणी केल्यास हे वाहन जाऊन यांत्रिक पद्धतीने मैला टाकी तसेच भुयारी गटारांची स्वच्छता करणार आहे. यासाठी पालिकेने प्रति वाहन १ हजार रुपये असा दर निश्चित केला आहे. टाकीतून उपसलेला गाळ सांडपाणी पुनप्र्रक्रिया प्रकल्पातच टाकला जाणार आहे. यासाठी प्रत्येक वाहनावर जीपीएस यंत्रणा लावण्यात आली आहे.

मैला टाकी खासगी व्यक्तींकडून केल्यास सावधान

शहराच्या स्वच्छतेसाठी खासगी व्यक्तींकडून मैला टाकी आणि भुयारी गटारांची स्वच्छता करण्यास कायद्याने बंदी  आहे. असे केल्यास २ वर्षे कारावास आणि ५ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा आहे.  सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास १० लाखांच्या नुकसान भरपाईची तरतूद ठेवण्यात आली आहे.  सफाईसाठी संपर्क साधून यांत्रिक पद्धतीने स्वच्छता करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

टोल फ्री क्रमांक

पूर्वी कुणाकडूनही मैला टाकी किंवा भुयारी गटारे साफ केली जात होती. ती पद्धत अमानवी होतीच शिवाय  कर्मचाऱ्यांच्या जिवावर बेतणारी होती. यासाठी पालिकेने स्वत: यंत्रणा उभारली आहे. नागरिकांच्या सोयीसाठी १४४२० हा टोल फ्री क्रमांकाची सेवा सुरू केली आहे. या क्रमांकावर तक्रार किंवा मागणी करू शकतात. ही सेवा २४ तास सुरू असून त्यावर व्हॉट्स?पद्वारे संदेशही पाठवता येतात. प्रत्येक मैला टाकीची तीन वर्षांतून एकदा स्वच्छता करणे आवश्यक आहे. यासाठी पालिकेने जनजागृती सुरू केली असून प्रत्येक निवासी संकुलांना यासंदर्भातील पत्रके पाठवून जनजागृती सुरू केली आहे. यामुळे या प्रयत्नांमुळे पालिकेचा सफाई मित्र चॅलेंज स्पर्धेत २९ वा क्रमांक आला आहे.

सफाई मित्रांच्या सुरक्षेला प्राधान्य देत पालिकेने मैला टाकी आणि भुयारी गटारे साफ करण्यासाठी स्वत:ची यंत्रणा उभारली आहे. त्याचे दर निष्टिद्धr(१५५)त केले असून नागरिकांच्या सोयीसाठी टोल फ्री क्रमांकदेखील सुरू केला आहे.

अजिंक्य बगाडे, उपायुक्त, वसई—विरार महापालिका