केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडून रुग्णालयाला २५ लाखांची मदत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई: करोना काळात प्राणवायूची गरज लक्षात घेऊन वसईच्या बंगली येथील कार्डिनल ग्रेशिअस मेमोरिअल रुग्णालयात दोन प्राणवायू निर्मिती संच प्रकल्प बसविण्यात आले आहे. शुक्रवारी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन झाले. यावेळी आठवले यांनी रुग्णालयाला आपल्या खासदार निधीतून २५ लाख रुपयांचा निधी जाहीर केला. वसईतील ४० वर्ष जुने कार्डिनल ग्रेशिअस रुग्णालयात सर्वसामान्य रुग्णांवर माफक दरात उपचार केले जातात. करोनाकाळात या रुग्णालयाने उल्लेखनीय सेवा केली होती. आता रुग्णालयाने तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयात दोन स्वतंत्र प्राणवायू निर्मिती गूगलच्या माध्यमातून प्रकल्प पाथ या संस्थेच्या सहकार्याने बसवले आहे. शुक्रवारी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी या प्रकल्पाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी रुग्णालयाचे सामाजिक कार्य पाहून २५ लाखांचा आर्थिक मदत खासदार निधीतून जाहीर केली. करोनाचा मानवतेविरोधात लढा सुरू आहे. पण मानव या लढय़ात विजयी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Independent oxygen generation project hospital ysh
First published on: 15-01-2022 at 00:38 IST