scorecardresearch

Premium

विरारच्या म्हाडा वसाहतीत आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेट केंद्र, दोन वर्षात ३०० मुलींचा देहव्यावापार

विरार मधील म्हाडा वसाहतीमधील एका इमारतीच्या सदनिकेत आंतरराष्ट्रीय देह व्यापार सुरू असल्याचे समोर आले आहे.

International sex racket centers in Virars Mhada Colony
दोन वर्षात ३०० हून अधिक मुली देहव्यावापारासाठी बांग्लादेशातून मुंबईत आणल्याचे तपासात समोर आले आहे.(फोटो- लोकसत्ता टीम)

सुहास बिर्‍हाडे, लोकसत्ता

वसई- विरार मधील म्हाडा वसाहतीमधील एका इमारतीच्या सदनिकेत आंतरराष्ट्रीय देह व्यापार सुरू असल्याचे समोर आले आहे. अनैतिक मानवी वाहतूक शाखेने या सदनिकेत छापा घालून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीची सुटका केली आहे. या प्रकरणी एका बांग्लादेशी आरोपीला अटक करण्यात आली असून त्याने मागील दोन वर्षात ३०० हून अधिक मुली देहव्यावापारासाठी बांग्लादेशातून मुंबईत आणल्याचे तपासात समोर आले आहे.

Suspension of students hindi university
वर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे निलंबन, वसतिगृह सोडण्याचे निर्देश
israel gaza war
इस्रायलला आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा दणका; गाझामधील नरसंहार रोखण्याचे दिले आदेश
Application by Foreign Creditors for Bankruptcy of Byju to Bangalore Bench of National Company Law Tribunal print economic news
परकीय देणेकऱ्यांकडून ‘बायजू’च्या दिवाळखोरीसाठी अर्ज; राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाच्या बंगळूरु खंडपीठाकडे धाव
Strong performance of Indian economy President Draupadi Murmu message on the eve of Republic Day
भारतीय अर्थव्यवस्थेची दमदार कामगिरी; प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचा संदेश

विरार पश्चिमेला बोळींज येथे म्हाडाची वसाहत आहे. यातील डी-७ इमारतीच्या सदनिका क्रमांक २१०४ मध्ये आंतरराष्ट्रीय देह व्यापार सुरू असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक शाखेला मिळाली होती. शुक्रवारी रात्री पोलिसांच्या पथकाने छापा घालून या फ्लॅट मधून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीची सुटका केली. अन्य दोन मुलींना नालासोपारा येथील प्रगतीनगर मधून अटक करण्यात आली. या आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेट टोळीचा सुत्रधार आरोपी अशोक दास असून तो बांग्लादेशी आहे. आपल्या साथीदारांच्या मदतीने तो बांग्लादेशातून बेकायदेशीरपणे अल्पवयीन मुली आणि तरुणींना फसववून देहव्यापारासाठी मुंबईत आणत होता. बांग्लादेशातून मुली आणल्यानंतर या फ्लॅटमध्ये ठेवायचा. त्यानंतर या मुलींना मुंबईच्या ग्रॅंट रोड येथील रेड लाईट एरिया मध्ये देहव्यापारासाठी पाठवत होता. त्याच्या अन्य साथाीदारांचा शोध सुरू आहे.मागील दोन वर्षात त्याने ३०० हून अधिक बांग्लादेशी मुलींना फसवून मुंबईत देहव्यापारासाठी आणल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांनी सांगितले.

आणखी वाचा-प्रेयसीने घरी बोलावले, आईने केला चाकूने हल्ला; जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू

म्हाडा वसाहत आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेट केंद्र

या प्रकरणातील आणखी धक्कादायक म्हणजे देहव्यापारासाठी म्हाडाच्या घरांचा होत असलेला वापर. बांग्लादेशातून आणलेल्या मुली म्हाडाच्या घरात ठेवल्या जायच्या आणि तेथून त्या मुंबईत पुरवल्या जात होत्या, अशी माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक संतोष चौधरी याने दिली. आरोपीने डी-७ इमारती मधील २१०४ क्रमांकाचा फ्लॅट करारनामा करून घेतला होता आणि त्याचा वापर देहव्यापारासाठी करायचा. मुळात म्हाडाची घरे भाडेतत्वावर देताना म्हाडाचा ना हरकत दाखला लागतो. याशिवाय पोलिसांनी पडताळणी करून ना हरकत दाखला (एनओसी) द्यायची असते. या नियमांचे पालन न झाल्याने म्हाडाच्या घरांचा वापर देहव्यापारासाठी होत असल्याचे यानिमित्ताने उघड झाले आहे. आम्ही करारनामा जप्त केला असून संबंधितांवर पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: International sex racket centers in virars mhada colony 300 girls trafficked in two years mrj

First published on: 09-12-2023 at 11:18 IST

आजचा ई-पेपर : वसई विरार

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×