वसई पूर्वेच्या तुंगारेश्वर फाटा येथील कुशल मंगल औद्योगिक वसाहतीत मांसाहारी हॉटेल चालवलं म्हणून हॉटेल मालकाला दर महिना २५ हजार रुपये दंड ठोठावल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. मांसाहारी हॉटेल सुरु करण्यात आलेल्या वसाहतीत मोठ्या प्रमाणात जैन समाज राहत असल्यामुळे या समाजाच्या ट्रस्टने कारवाई करत हॉटेल मालकाला नोटीस पाठवली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- वसई रेल्वे पोलीस ठाण्याच्या ९७ कर्मचाऱ्यांवर सात स्थानकांचा भार; मंजूर पदापैकी अजूनही ६० ते ६५ जागा रिक्त

वसई पूर्वेच्या तुंगारेश्वर फाटा येथे कुशल मंगल औद्योगिक वसाहत आहे. या ठिकाणी गाळा भाड्याने घेऊन वैभव भणगे यांनी हॉटेल डायमंड नावाने मांसाहारी हॉटेल सुरू केले आहे. मागील सात ते आठ महिन्यापासून हे सुरू आहे. मात्र या हॉटेलच्या समोर जैन मंदिर तसेच या मंगल सोसायटीमध्ये ही जैन समाजाचे वर्चस्व आहे. हॉटेलमध्ये मांसाहार तयार होत असल्याने हे हॉटेल बंद करण्यात यावे अशी नोटीस श्री चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन ट्रस्टने कुशल मंगल सोसायटीला दिली होती. त्यांनतर सोसायटीने गाळेधारकाला नोटीस देऊन मांसाहारी सुरू असलेले हॉटेल बंद करण्यात यावे अन्यथा दर महिना २५ हजारांचा दंड आकारला जाईल असे सांगण्यात आले आहे. या अजब प्रकारामुळे पुन्हा एकदा जैन समाज व मराठी असा वाद निर्माण झाला आहे.

हेही वाचा- वसईतील आरोग्यव्यवस्थेला बळकटी; महापालिकेची शहरात १२ नवीन आरोग्य केंद्रे

हॉटेल मांसाहारी असल्याने बंद करण्याची नोटीस दिली आहे ती चुकीच्या पद्धतीने दिली आहे. इथल्या लोकांना खरंच मांसाहाराची अडचण असती तर हॉटेल सुरू झालं तेव्हाच त्यांनी विरोध केला असता. आताच असा विरोध का केला जातो असा प्रश्न हॉटेल मालक वैभव भणगे यांनी सांगितले आहे. गाळेधारक तिवारी यांच्यासोबत माझा तीन वर्षासाठी भाडेतत्त्वावर करार झाला आहे. त्यामुळे मी हे हॉटेल सुरूच ठेवणार आहे. तसेच बंद करण्याची नोटीस दिली आहे त्यावर कायदेशीर मार्गाने लढा ही सुरू ठेवला जाईल असेही भणगे यांनी सांगितले आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jain trust fined rs 25 thousand per month to non vegetarian hotel at kushal mangal industrial estate in tungareshwar phata of vasai east dpj
First published on: 09-12-2022 at 16:33 IST