वसई: महाराष्ट्रात मराठी आणि अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांचा मुद्दा सध्या अतिशय चर्चेत आहे. अशातच आता अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा कार्यशाळा सुरू करण्यात आली असून १५ जूनपर्यंत चालणाऱ्या या कार्यशाळेत सामील होणे प्रत्येक अमराठी रिक्षाचालकाला परिवहन विभागाकडून अनिवार्य करण्यात आले आहे.
मिरा भाईंदर शहरातून सुरू झालेला मराठी आणि अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांचा वाद आता महाराष्ट्रभरात चर्चेचा विषय ठरला आहे. राजकीय चढाओढ, विविध पक्षांनी केलेल्या टीका यामुळे हा वाद टिपेला पोहोचला होता. तर १ मे पासून परिवहन विभागाने राज्यात परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला. यामुळे राज्यातील रिक्षाचालकांनी रस्त्यावर उतरून निषेध नोंदवण्याचा इशाराही दिला होता. तर त्यानंतर चालकांना प्रवाशांशी संवाद साधता येईल एवढे ‘फंक्शनल मराठी’ शिकण्यासाठी १५ ऑगस्ट २०२६ ही मुदत देण्यात आली.
तर १५ ऑगस्टनंतर मराठी न बोलणाऱ्या चालकांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते आणि परवाने नूतनीकरणासाठी अडचण येऊ शकते. त्यामुळे राज्यातील अमराठी रिक्षा, टॅक्सी, ओला, उबेर आणि रॅपिडो चालकांमध्ये मराठी भाषेचा प्रचार-प्रसार करण्याच्या उद्देशाने तसेच प्रवाशांशी सुलभ व व्यावहारिक सुसंवाद प्रस्थापित करण्यासाठी परिवहन विभाग, तसेच राज्य मराठी विकास संस्था, कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांच्या सहकार्याने राज्यात मराठी भाषा कार्यशाळा चालवली जाणार आहे. ही कार्यशाळा १ जून २०२६ ते १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत राबवली जाणार आहे.
कार्यशाळेअंतर्गत सर्व संबंधित अमराठी चालकांसाठी किमान ४ तासिका पूर्ण करणे कायदेशीररीत्या बंधनकारक करण्यात आले आहे. कार्यशाळा यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या चालकांना परिवहन विभागामार्फत अधिकृत प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तर सदर प्रमाणपत्र सर्व चालकांना जपून ठेवावे लागणार आहे. पालघर जिल्ह्यात एकूण १२ केंद्रांवर चालकांना मराठी भाषा शिकवली जाणार आहे.
मराठी भाषा कार्यशाळा केंद्र:
पालघर (ग्रामीण)
केंद्र समन्वयकाचे नाव
प्रविण दवणे
भ्रमणध्वनी क्रमांक – ९८९०२९५२७२
१. केंद्राचे नाव – डहाणू
केंद्र संचालकाचे नाव – मारूती वाघमारे
भ्रमणध्वनी क्रमांक – ९८६७२२३५८४
केंद्राची व्याप्ती – डहाणू संपूर्ण विभाग
केंद्राचा पत्ता – ज्येष्ठ नागरिक संस्था, पारनाका, डहाणू, पालघर
२. केंद्राचे नाव
बोईसर
केंद्र संचालकाचे नाव – संजय घरत
भ्रमणध्वनी क्रमांक – ७०३८८९०१३७
केंद्राची व्याप्ती – बोईसर संपूर्ण
केंद्राचा पत्ता – जि.प.शाळा, नवापूर नाका, बोईसर, पालघर
३. केंद्राचे नाव – पालघर
केंद्र संचालकाचे नाव – नामदेव कवळे
भ्रमणध्वनी क्रमांक – ९७६५३४३७९६
केंद्राची व्याप्ती – पालघर संपूर्ण
केंद्राचा पत्ता – आर्यन हायस्कूल, पालघर
पालघर (शहरी) विरार
केंद्र समन्वयकाचे नाव – सुरेखा कुरकुरे
भ्रमणध्वनी क्रमांक – ९७६४०५२२१२
१. केंद्राचे नाव – विरार (पूर्व)
केंद्र संचालकाचे नाव – उदय अरुण जाधव
भ्रमणध्वनी क्रमांक – ९९६०८९०९२३
केंद्राची व्याप्ती – विरार पूर्वचा मनवेलपाडा, जीवदानी
केंद्राचा पत्ता – पी. एस. कोचिंग क्लासेस. शॉप नं.२, विष्णू विहार कॉम्प्लेक्स बिल्डिंग नं-३, प्रियदर्शनी हॉस्पिटल समोर, मनवेलपाडा तलाव रिक्षा स्टैंड शेजारी, विरार (पूर्व)
२. केंद्राचे नाव – विरार (पश्चिम)
केंद्र संचालकाचे नाव – अश्विनी भोईर
भ्रमणध्वनी क्रमांक – ८८३०८६४५४७
केंद्राची व्याप्ती – विरार पश्चिम बोळींज
केंद्राचा पत्ता – बहुजन विकास आघाडी कार्यालय, गज क्रिस्टल बिल्डिंग, पराग मेडीकल गल्ली, विरार (प.) (सखाराम महाडीक यांचे ऑफिस)
३. केंद्राचे नाव – विरार (पश्चिम)
केंद्र संचालकाचे नाव – प्रतिभा चोरघे
भ्रमणध्वनी क्रमांक – ९९२३७५५१८६
केंद्राची व्याप्ती – विरार शहर पश्चिम
केंद्राचा पत्ता – जुने विवा कॉलेज, पहिला मजला, रुम नं. १०१, विरार (पश्चिम)
वसई
केंद्र समन्वयकाचे नाव – प्रकाश पाटील
भ्रमणध्वनी क्रमांक – ९८९०५६०९९९
१. केंद्राचे नाव – वसई पश्चिम
केंद्र संचालकाचे नाव – डॉ. पल्लवी परुळेकर – बनसोडे
भ्रमणध्वनी क्रमांक – ९९२३०३०१०१
केंद्राची व्याप्ती – वसई पश्चिम.. रेल्वे स्थानक विभाग
केंद्राचा पत्ता – जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, अष्टविनायक लेन,के टी व्हिलेज, वसई पश्चिम
२. केंद्राचे नाव – वसई पूर्व
केंद्र संचालकाचे नाव – चित्रा पाटील
भ्रमणध्वनी क्रमांक – ९६५७०६९२७०
केंद्राची व्याप्ती – संपूर्ण वसई पूर्व परिसर
केंद्राचा पत्ता – गोखीवरे जिल्हा परिषद स्कूल, वसई पूर्व
३. केंद्राचे नाव – नायगाव
केंद्र संचालकाचे नाव – रंजना ठाकूर
भ्रमणध्वनी क्रमांक – ९८२३७७१३८०
केंद्राची व्याप्ती – नायगाव संपूर्ण
केंद्राचा पत्ता – नितिन ठाकूर यांचे कार्यालय वडवली, पाली बंदर कॅनरा बँकेजवळ, नायगाव (प.) ता. पो. वसई, जिल्हा-पालघर ४०१२०१
नालासोपारा
केंद्र समन्वयकाचे नाव – सीमा पाटील
भ्रमणध्वनी क्रमांक – ९८६०७६०७५३
१. केंद्राचे नाव – नालासोपारा पूर्व
केंद्र संचालकाचे नाव – डॉ. सुरेखा धनावडे
भ्रमणध्वनी क्रमांक – ९०२२९०२८९३
केंद्राची व्याप्ती – नालासोपारा पूर्व संपूर्ण विभाग
केंद्राचा पत्ता – के.एम.पी.डी. शाळा, नालासोपारा पूर्व
२. केंद्राचे नाव – नालासोपारा पूर्व
केंद्र संचालकाचे नाव – वर्षा भोसले
भ्रमणध्वनी क्रमांक – ९८६०५३११२६
प्रशिक्षक – रोहिणी जाधव
केंद्राची व्याप्ती – नालासोपारा रेल्वे स्थानक
केंद्राचा पत्ता – दुबे इस्टेट, अमित दुबे यांचे ऑफिस, नालासोपारा पूर्व
३. केंद्राचे नाव – नालासोपारा पश्चिम
केंद्र संचालकाचे नाव – केदार जोशी
भ्रमणध्वनी क्रमांक – ८९९९३४४५२
केंद्राची व्याप्ती – नालासोपारा पश्चिम संपूर्ण विभाग
केंद्राचा पत्ता – साई चैतन्य धाम मंदिर, नालासोपारा पश्चिम
