scorecardresearch

मीरा रोड येथे निवासी इमारतीला भीषण आग ;४० रहिवाशांची सुखरूप सुटका

मीरा रोड पूर्व येथील ‘वासुदेव हाइट्स’ या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर इलेक्ट्रिक शॉकसर्किटमुळे भीषण आग लागली होती.

भाईंदर : मीरा रोड पूर्व येथील ‘वासुदेव हाइट्स’ या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर इलेक्ट्रिक शॉकसर्किटमुळे भीषण आग लागली होती. अग्निशमन यंत्रणेच्या सहा गाडय़ा आणि ५० कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचल्याने आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मीरा रोड पूर्व येथील रामदेव पार्क परिसरात वासुदेव हाइट्स ही इमारत आहे. गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या ‘इलेक्ट्रिक डक’ला अचानक शॉर्कसर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली. आगीची तीव्रता इतकी अधिक होती की, यामुळे इमारतीमधील पहिल्या मजल्यावरचे खोली क्रमांक १०१ आणि
१०२ हे काही क्षणांत जळून खाक झाले.
आग वेगाने पसरत असल्याने तात्काळ अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले. तोपर्यंत आग हळूहळू तिसऱ्या मजल्यापर्यंत पसरू लागली होती. त्यामुळे अग्निशमन विभागाने पहिल्या व दुसऱ्या मजल्यावरील इमारतीच्या खिडकीमधील ग्रील कापून नागरिकांना टीटीएल वाहनाच्या मदतीने खाली आणले. साधारण ४० नागरिकांची बचावकार्य करून सुटका करण्यात आली.
तासाभरात आगीवर नियंत्रण मिळवल्याची माहिती अग्निशमन अधिकारी प्रकाश बोराडे यांनी दिली.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Massive fire at residential building mira road residents rescued safely amy

ताज्या बातम्या