scorecardresearch

शिवसेना पदाधिकाऱ्यास महिला शिवसैनिकांची मारहाण

भिसे यांनी शाखेत अश्लील शिवीगाळ केल्याने शाखेबाहेर नेऊन मारहाण केल्याचे परुळेकर यांनी सांगितले.

(संग्रहित छायाचित्र)

वसई : भाईंदर शिवसेना शहर प्रमुख पप्पू भिसे यांना पक्षांतर्गत वादामुळे भर शाखेच्या बाहेर महिला शिवसैनिकांनी मारहाण केली. मारहाणाची चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित झाली आहे.

पप्पू भिसे हे भाईंदर शिवसेना शहरप्रमुख आहे. रविवारी दुपारी पक्षांतर्गत कार्यक्रम होता. त्या वेळी महिला शहर संघटक वैदेही परुळेकर यांच्याशी त्याचा वाद झाला. त्यानंतर परुळेकर आणि अन्य महिलांनी पप्पू भिसे यांना शाखेच्या बाहेर खेचत बेदम चोप दिला. मारहाणीची चित्रफीत शहरात गाजत आहे. याप्रकरणी शहरप्रमुख पप्पू भिसे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे  अशी माहिती भाईंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुटराव पाटील यांनी दिली. भिसे यांच्या तक्रारीवरून परुळेकर यांच्याविरोधात मारहणीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पक्षांतर्गत नियुक्त्यांवरून हा वाद निर्माण झाला होता. भिसे यांनी शाखेत अश्लील शिवीगाळ केल्याने शाखेबाहेर नेऊन मारहाण केल्याचे परुळेकर यांनी सांगितले.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mira bhayander shiv sena city chief beaten by female shiv sainiks zws