भाईंदर : मिरा रोड पूर्व येथील एका स्पामध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ‘तनिष्का स्पा’नावाने सुरू असलेल्या या ठिकाणी छापा टाकून पोलिसांनी १४ मुलींची सुटका केली असून, तीन जणांना अटक ताब्यात घेतले आहे. मिरा रोड पूर्व परिसरातील तनिष्का स्पामध्ये बेकायदेशीररीत्या देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर उपायुक्त राहुल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने छापा टाकला.

या कारवाईदरम्यान थायलंड तसेच भारतातील अशा एकूण १४ मुलींची सुटका करण्यात आली. या प्रकरणी स्पा चालवणाऱ्या आणि या रॅकेटशी संबंधित तीन आरोपींना पोलिसांनी घटनास्थळावरून ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरोधात मिरा रोड पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा (PITA) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, सुटका करण्यात आलेल्या मुलींना वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचे समुपदेशन केले जाणार आहे. या प्रकरणाचा अधिक तपास मिरा रोड पोलीस करत आहेत.