प्रसेनजीत इंगळे

विरार :  शहरात मृत्यूंची संख्या वाढत असून मृतदेहांच्या शवविच्छेदनासाठी केंद्रांची कमतरता निर्माण झाली आहे. पालिकचे स्वत:चे शवविच्छेदन केंद्र नसल्याने शविवच्छेदनानासाठी जिल्हा परिषदेच्या केंद्रावर अवलंबून रहावे लागते. त्यांची संख्या देखील कमी असल्याने मृतदेहांना तासनतास प्रतीक्षा करावी लागी आहे. अथवा मुंबईची रुग्णालये गाठावी लागतात. पालिकेने मागील १० वर्षांत या गोष्टीचा विचारच केला नाही.

india demand of land marathi news
कार्यालयीन जागांच्या मागणीत ४३ टक्के वाढ, पहिल्या तिमाहीत १.६२ कोटी चौरस फुटांचे व्यवहार; बंगळूरुचा सर्वाधिक वाटा
Women officers and employees are fully responsible for voting stations where number of women voters is more than men
महिलांच्या हाती मतदान केंद्राची दोरी…
Madhabi Puri Buch, SEBI, Indian market, GST, investment
गुंतवणूकदारांच्या वाढत्या आस्थेमुळे भांडवली बाजाराला उच्च मूल्यांकन – सेबी
Navi Mumbai parking problem
नवी मुंबई : वाढत्या वाहनसंख्येमुळे पार्किंग समस्या अधिक जटील

वसई विरार शहरात अपघात, आत्महत्या, अकाली मृत्यू, तसेच गुन्ह्यत हत्या अशा विविध कारणाने मृत्यूंचे प्रमाण वाढले आहे. यात अनेकवेळा शवविच्छेदनाची गरज पडते. मिळालेल्या मातीहीनुसार शहरातील जिल्हापरिषदेच्या शवविच्छेदन केंद्रात दिवसाला सरासरी ३ ते ४ मृतदेहाचे शवविच्छेदन केले जात आहे. यातील सर्वाधिक आकडा हा महानगरपालिका क्षेत्रातील आहे. यामुळे जिल्हापरिषदच्या केंद्रावर मोठा ताण येत आहे. यात जिल्हापरिषदच्या शवविच्छेदन केंद्रात मनुष्यबळ कमी असल्याने मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी मोठा कालावधी लागतो. त्यात अद्यावत यंत्रणा नसल्याने अनेकवेळा मुंबईला शवविच्छेदन अहवालासाठी मृतदेह पाठवावे लागत आहेत. याचा सर्वाधिक त्रास पोलिसांना सहन करावा लागतो.

जिल्हापरिषदेच्या माहितीनुसार वसई विरार परिसारत आगाशी, कामन, नवघर, नालासोपारा पष्टिद्धr(१५५)म आणि विरार ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदन केंद्र आहेत. यातील आगाशी आरोग्य केंद्रात ३ डॉक्टर, कामन प्राथमिक आरोग्य केंद्रात ३, नवघर मध्ये २ तर विरार ग्रामीण रुग्णालयात २ डॉक्टर आहेत. ह्य डॉक्टरांवर संपूर्ण आरोग्य केंद्राचा भार असतो. यामुळे शवविच्छेदन करण्यासाठी त्यांना वेळ काढावा लागत असल्याने शवविच्छेदन प्रक्रिया रेंगाळली जाते. याचा फटका नागरिकांना सहन करवा लागत आहे. तर अनेक गुन्ह्यत मयत झालेल्यांचा शवविच्छेदन अहवाल पोलिसांसाठी अत्यंत गरजेचा असतो पण वेळेवर अहवाल मिळत नसल्याने त्यांना गुन्ह्यच्या तपासात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

वसई विरार महानगर पालिकेने आजतयागत या विषयाकडे कोणतेही लक्ष पुरविले नाही. मागील १० वर्षांपासून पालिकेने केवळ २ रुग्णालये उभारली त्यात ही यंत्रणा राबविणे पालिकेला सहज शक्य असूनही पालिकेने यावर कधीच लक्ष पुरविले नाही. याबात माहिती देताना आरोग्य विभागाने याबाबत कधीच विचार झाला नाही असे सांगितले अतिरिक्त आयुक्त संतोष देहेरकर यांनी सांगितले सदराचा विषय धोरणात्मक असल्याने आयुक्त आणि वैद्यकीय अधिकारी यांच्याशी सदराची सुविधा उपलब्ध करण्यासाठी चर्चा केली जाईल. तर वसई ग्रामीण वैद्यकीय अधिकारी जिल्हापरिषद डॉ. योजना जाधव यांनी जिल्हापरिषदच्या शवविच्छेदन केंद्रावरील भर पाहता पालिकेने स्वताचे शवविच्छेदनकेंद्र उभारणे गरजेचे असल्याचे सांगितले. वसई विरार महानगर पालिका शहरात आरोग्य यंत्रणेचे जाळे उभे करण्याचा अट्टाहास करत असताना त्यात शवविच्छेदन केंद्र उभारण्याची मागणी केली जात आहे. जिल्हापरिषदच्या शवविच्छेदन केंद्रात मृतदेहाची चिरफाड करणारे  शासकीय कर्मचारीच नाहीत. जिल्हापरिषदचे वसई तालुक्यात असलेल्या ८ आरोग्य केंद्रापैकी ५ आरोग्य केंद्रात शवविच्छेदन केंद्र आहे. आपण आजतयागत या केंद्रातील कटर (मृतदेहाची चिरफाड करणारी व्यक्ती) याची शासकीय स्तरावर कधीच नियुक्ती करण्यात आली नाही. खाजगी  सफाई कर्मचारी अथवा गावातील कोणतीही व्यक्ती अधिक मद्यपान करून हे काम करत असतात. त्याला कोणतेही शासकीय मानधन दिले जात नाही. मृताच्या नातेवाईकांकडून पैसे घेवून हे काम केले जात आहे. दुर्दैव म्हणजे शवविच्छेदन प्रक्रियेची अवहेलना केली जात आहे.