वसई: नालासोपारा येथील अवधेश विकास यादव शाळेतील अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकऱणाातील आरोपींवर अखेर कलमे वाढविण्यात आली आहे. याप्रकरणातील आरोपी मुख्याध्यापक आणि पर्यवेक्षकाविरोधात कलम वाढविण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. नालासोपारा पूर्वेच्या संतोषभुवन येथे यादवेश विकास इंग्रजी शाळा आहे. या शाळेत ९ वीत शिकणार्या १४ वर्षीय विद्यार्थीनीवर शाळेतील शिक्षक अमित दुबे हा मागील ५ महिन्यांपासून धमकावून बलात्कार करत होता. पोलिसांनी त्याच्यावर बलात्कारा आणि पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल करून अटक केली होती. परंतु शाळेचा मुख्याध्यापक विकास यादव आणि पर्यवेक्षख संतालाल यादाव यांनी हा प्रकार दडवला होता. २०२२ मध्ये दुबे पीडित मुलीचा लैंगिक छळ करत होता. हा प्रकार पीडित मुलीने पर्यवेक्षक संतलाल यादव आणि मुख्याध्यापक विकास यादव यांना सांगितला होता. मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. याबाबत पीडित मुलीचा भाऊ विचारणा करण्यासाठी गेला असताना त्याला मुख्याध्यापक विकास यादव याने मारहाण केली होती. आता देखील बलात्काराची घटना घडल्यानंतर या दोघांनी प्रकरण मिटविण्यास सांगितले होते. जनक्षोभानंतर पेल्हार पोलिसांनी फिर्यादी मुलीचा नव्याने पुरवणी जबाब नोंदवून मुख्याध्यापक विकास यादव आणि पर्यवेक्षक संतलाल यादव याच्याविरोधात पोक्सोच्या कलम २१ (२), आणि भारतीय न्याय संहितेच्या कलम ११५(२) ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला होता. हेही वाचा : वसईत गणेशोत्सव की फलकोत्सव? फलकांमुळे शहर विद्रूप, रस्ता अडवून मंडप उभारणी मात्र ही कलमे किरकोळ असून या मध्ये केवळ २ वर्षांच्या शिक्षेची तरतूद असल्याने त्यांना अटक करता येत नव्हती. यामुळे शिवसेना ठाकरे गटाने कलम वाढविण्यात यावीत अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला होता. शिवसेनेच्या या मागणीला यश आले आणि पोलिासंनी कलमांत वाढ केली. मुख्याध्यापक आणि पर्यवक्षेकाविरोधात आता कलम १७ आणि १९ ची वाढ करण्यात आली आहे. हेही वाचा : मिरा रोड येथे सर्वधर्मीय दफनभूमीचा निर्णय मागे पोलिसांनी कलमे वाढवली ही समाधानाची बाब आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणाच्या एसआयटी चौकशीची आमची मागणी कायम आहे. शाळा अनधिकृत असून त्यावर कारवाईसाठी आमचा लढा चालूच राहणार असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा सरचिटणीस ॲड अनिल चव्हाण यांनी सांगितले. आरोपी अमित दुबे हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणाचा आम्ही सखोल तपसा करत आहोत अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक जावेद मुल्ला यांनी दिली.