प्रत्येक वेळी चोरीसाठी नवा भागीदार

पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी तसेच चोरलेल्या मालावरून वाद होऊ  नये यासाठी गुन्हेगारांनी आता नवीन कार्यपद्धती सुरू केली आहे.

पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी नवीन शक्कल

वसई : पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी तसेच चोरलेल्या मालावरून वाद होऊ  नये यासाठी गुन्हेगारांनी आता नवीन कार्यपद्धती सुरू केली आहे. गुन्हे करताना एकच टोळी न बनवता प्रत्येक वेळी नवीन लोकांना घेऊन नवीन टोळ्या बनवायच्या आणि काही काळ गुन्हे करायची अशी ही पद्धत आहे. याप्रकरणी एका भागीदाराला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून घरफोडीच्या १२ गुन्ह्य़ांची उकल केली आहे. मात्र त्याचा साथीदार आणि म्होरक्या फरार आहे.

शहरातील वाढत्या घरफोडीच्या घटनांचा तपास करताना पोलिसांनी एका सोहेल खान नावाच्या तरुणाला अटक केली. सकाळच्या वेळी भंगार गोळा करण्याच्या निमित्ताने तो बंद घरांची रेकी करायचा आणि नंतर त्या घरात चोरी करायचा. हा आरोपी पहाटेच्या वेळी चोरी करायचा. त्याचे सीसीटीव्ही चित्रण मिळवून त्या आधारे त्याच्या देहबोलीवरून त्याची ओळख पटवली आणि त्याला पकडले असे पोलीस उपनिरीक्षक अभिजित टेलर यांनी सांगितले. त्याने मागील आठ महिन्यांत केलेल्या १२ घरफोडींच्या गुन्ह्यंची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. या आरोपीचा साथीदार हा कुख्यात गुन्हेगार आहे. पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी तो नवनवीन लोकांना घेऊन चोरीचे गुन्हे करत होता. त्यामुळे अद्याप तो पोलिसांच्या हाती लागला नाही. आम्ही त्या फरार आरोपीच शोध घेत असून लवकरच त्याला पकडू , असे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदेश राणे यांनी सांगितले.

 गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केलेला पोलीस निरीक्षक प्रफुल्ल वाघ (गुन्हे) यांच्यासह सचिन लोखंडे, हर्षद चव्हाण, संदीप शेरमाळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

गुन्ह्य़ाची पद्धत

सकाळच्या वेळी भंगार गोळा करण्याच्या निमित्ताने आरोपी रेकी करून नंतर चोरी करायचा. पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून तो नवनवीन साथीदार घ्यायचा त्यांच्या सोबत वेगवेगळ्या ठिकाणी चोऱ्या करायचा. काही चोऱ्या झाल्या की तो सोबतच्या साथीदारांना सोडून द्यायचा. नंतर नवीन साथीदारांसमवेत टोळी करून चोरी करायचा.  यामुळे मालमत्तेच्या वाटणीत वाद होत नव्हते.  शिवाय पोलीसही सहज त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हते. आरोपी हा सराईत असून त्याने या परिसरात ५० पेक्षा जास्त गुन्हे केलेले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व वसई विरार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: New partner theft every time ysh

Next Story
धोकादायक इमारतीचा प्रश्न प्रलंबित
ताज्या बातम्या