वसई : नायगाव पूर्वेतील जूचंद्र चंद्रपाडा येथे असलेल्या आई चंडिका मातेच्या प्रवेशद्वाराजवळ कचरा टाकला जात आहे. या टाकणाऱ्यांना आवर घालण्यासाठी चंद्रपाडा ग्रामपंचायतीचे सदस्य व कर्मचारी यांनी काही दिवसांपासून रात्रीचा पहारा ठेवला आहे. नायगाव पूर्वेच्या जूचंद्र येथील डोंगरावर आई चंडिका मातेचे मंदिर आहे. या मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या जवळच मागील दोन ते तीन वर्षांपासून कचरा टाकला जात आहे. यामुळे येथून ये-जा करणाऱ्या नागरिकांना व मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांना या घाणीच्या दरुगधीचा सामना करावा लागत होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यासाठी या भागात कचरा टाकू नये यासाठीच्या सूचना फलक लावण्यात आले होते, परंतु त्या ठिकाणी कचरा टाकण्याचे सत्र सुरूच होते. रिक्षातून, सायकलवरून, दुचाकीवरून कचऱ्याने भरलेल्या पिशव्या फेकून दिल्या जात होत्या.  त्यामुळे चंद्रपाडा आणि वाकिपाडा ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी आणि इतर कर्मचाऱ्यांनी मंदिर परिसरात तळ ठोकून कचरा फेकणाऱ्यांवर पाळत ठेवली. काहींना समज दिली.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Night watch cleanliness garbage near entrance of chandika mata juchandra ysh
First published on: 22-11-2022 at 00:02 IST