वसई : police recruitment 2023 मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील भरती प्रक्रियेमध्ये रविवार, २ एप्रिलला शिपाई पदाची लेखी परीक्षा पार पडणार आहे. पुरुष उमेदवारांसाठी भाईंदर पश्चिमेच्या नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानात तर महिला उमेदवारांसाठी भाईंदर पूर्वच्या बाळासाहेब ठाकरे मैदानात लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. सकाळी ५ वाजता उमेदवारांना परीक्षा केंद्राच्या ठिकाणी पोहचावे लागणार आहे. सकाळी ८:३० ते १० यावेळेत लेखी परीक्षा होईल. उमेदवारांना महाआयटीकडून प्रवेशपत्र देण्यात येणार असून उमेदवारांनी ते महाआयटीच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करायचे आहे. कुठलाही गैरप्रकार होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. यासाठी फक्त प्रवेशपत्र सोबत आणायचे आहे. उमेदवारांना पेन आणि पॅडदेखील पुरवले जाणार आहे.

“कुस्तीपटू न्याय मागत आहेत, पण भाजपा…”, ‘स्माइल अँबेसिडर’ सचिन तेंडुलकरला राष्ट्रवादीचा खोचक सल्ला