Police Bharti Written Exam: पोलीस भरतीसाठी उद्या लेखी परीक्षा 

मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील भरती प्रक्रियेमध्ये  रविवार, २ एप्रिलला शिपाई पदाची लेखी परीक्षा पार पडणार आहे.

police
पोलीस (संग्रहित छायाचित्र)लोकसत्ता

वसई : police recruitment 2023 मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील भरती प्रक्रियेमध्ये  रविवार, २ एप्रिलला शिपाई पदाची लेखी परीक्षा पार पडणार आहे. पुरुष उमेदवारांसाठी भाईंदर पश्चिमेच्या  नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानात तर महिला उमेदवारांसाठी भाईंदर पूर्वच्या  बाळासाहेब ठाकरे मैदानात लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. सकाळी ५ वाजता उमेदवारांना परीक्षा केंद्राच्या ठिकाणी पोहचावे लागणार आहे. सकाळी ८:३० ते १० यावेळेत  लेखी परीक्षा होईल.  उमेदवारांना महाआयटीकडून प्रवेशपत्र देण्यात येणार असून उमेदवारांनी ते महाआयटीच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करायचे आहे. कुठलाही गैरप्रकार होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. यासाठी फक्त प्रवेशपत्र सोबत आणायचे आहे. उमेदवारांना पेन आणि पॅडदेखील पुरवले जाणार आहे.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-04-2023 at 00:02 IST
Next Story
वसई, विरार शहरातही करोनाचा पुन्हा शिरकाव; रुग्णसंख्येत अचानक वाढ, पालिकेचा करोना नियंत्रण कक्ष सुरू
Exit mobile version