आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या वरीष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. आगमी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयात अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. अतिरिक्त पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक यांनी शुक्रवारी संध्याकाळी बदलीचे आदेश काढले. त्यानुसार मिरा भाईंदर परिमंडळ-१ चे पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांची मुख्यालयात बदली करण्यात आली असून त्यांच्या  जागी पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> मिरा रोडमध्ये घरात गॅस सिलेंडरचा स्फोट; एक जण जखमी

retired employees of KEM
केईएममधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन
ED claim in court in Delhi liquor scam case that crime is impossible without Sisodian  participation
सिसोदियांच्या सहभागाशिवाय गुन्हा अशक्य! दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी ‘ईडी’चा न्यायालयात दावा
Job Opportunity Opportunities in Maharashtra State Police Force
नोकरीची संधी: महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील संधी
iqbal singh chahal
BMC च्या आयुक्तपदावरून हटवल्यानंतर इक्बालसिंग चहल आता मुख्यमंत्र्यांच्या दरबारी, अपर मुख्य सचिवपदी नियुक्ती

सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या मिरा रोड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) महेश तरडे यांची बदली  नियंत्रण कक्षात. तर नवघरचे सहाय्यक आयुक्त  उमेश माने पाटील यांची बदली तुळींज विभागात करण्यात आली आहे. मुख्यालयाचे सहाय्यक आयुक्त विजय कुमार मराठे यांची मिरा रोड येथे तर तर नियंत्रण कक्षातील सहाय्यक पोलीस आयुक्त बजरंग देसाई यांची नवघर येथे बदली करण्यात आली आहे. नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीम मधील सहाय्यक पोलीस आयुक्त  गीतांजली दुधाने यांची मुख्यालयात  बदली करण्यात आली आहे.