वसई : मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील पोलीस भरती प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू झाली. पहिल्याच दिवशी महिलांची मैदानी चाचणी घेण्यात आली.  महिला पोलिसांच्या २९४ जागांसाठी ११ हजार ७८७ अर्ज आले असून महिला आणि पुरूषांच्या एकूण ९९६ जागांसाठी ७४ हजार ४५८ उमेदवारांचे अर्ज आले आहेत.  २८ फेब्रुवारीपर्यंत ही मैदानी चाचणी होणार आहे.

 सध्या शिपाई पदाच्या ९८६ तर शिपाई वाहन चालक पदाच्या दहा अशा एकूण ९९६ पदांसाठी भरती सुरू आहे.  पोलीस आयुक्त मधुकर पांडेय, अतिरिक्त पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो अधिकारी-अंमलदारांच्या बंदोबस्तात भरती प्रक्रिया सुरू आहे.  महिलांच्या २९४ जागांसाठी ११ हजार ७८७ अर्ज आले आहेत. यामध्ये ३ महिलांसाठी चालक म्हणून जागा उपलब्ध आहे.

BMC Recruitment 2024
बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘या’ पदासाठी निघाली मोठी भरती! ९० हजारपर्यंत मिळू शकतो पगार
pune rte marathi news
आरटीई प्रवेश प्रक्रियेतील बदलांनंतर पहिल्यांदाच नोंदणी प्रक्रिया सुरू… कसा आहे पालकांचा प्रतिसाद?
air pollution control system has been in dust since three months
पिंपरी : हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा तीन महिन्यांपासून धूळखात
‘आयसर’च्या प्रवेष परीक्षेची तारीख जाहीर; अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू