वसई: वसईत अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे शहरात प्रदूषण व वाहतूक कोंडीची समस्या जटिल झाली आहे. हे प्रदूषण रोखण्यासाठी सणासुदीच्या काळात अवजड वाहनांना बंदी घालण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून वाहतूक सुरूच ठेवल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी थेट गाड्या अडवून धरल्या होत्या.वसई विरार शहरात सुरू असलेल्या विकास कामामुळे माती, रेती, काँक्रिट या मालाची वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांचे प्रमाण वाढले आहे.यामुळे त्या वाहनांच्या चाकाला व वाहनातून वाहतूक करताना काही वेळा माती रस्त्यावर पडते.यामुळे प्रदूषण निर्माण होऊ लागले आहे. तर दुसरीकडे शहरांतर्गत रस्ते अरुंद असल्याने अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली आहे.

विशेषतः सणासुदीच्या काळात नागरिक हे खरेदी व  फिरण्यासाठी बाहेर पडत असल्याने रस्त्यावर मोठी गर्दी असते. अवजड वाहनांमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी पाच ते सहा दिवस वसई पारनाका, सागरशेत रस्ता , पापडी रस्ता माती व काँक्रीट वाहतूक करण्यासाठी बंद करावी अशी मागणी भाजपाचे वसई शहर मंडळ अध्यक्ष नंदकुमार महाजन यांनी वाहतूक विभागाकडे केली होती.

mumbai High Court ordered government to set up committee to consider phased ban on diesel and petrol vehicles
डिझेल, पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांना टप्प्याटप्प्याने बंदी घालणे शक्य? वायू प्रदूषण रोखण्यासाठी समिती स्थापन करण्याचे न्यायालयाचे आदेश
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Vashi toll plaza toll exemption traffic congestion mumbai entryways
टोलमुक्तीनंतरही कोंडी कायम, वाशी टोलनाक्यावर दोन्ही प्रवेशमार्गांवर वाहतुकीचा ताण
Chandrakant Patil instructs forest officials to ensure safety of hills in Pune
पुणे शहरातील टेकड्याच्या सुरक्षितेतच्यादृष्टीने उपाययोजना करा, वन अधिकार्‍यांना चंद्रकांत पाटील यांच्या सूचना
nitin gadkari
Nitin Gadkari : करोना, दंगली, लढायांपेक्षा अधिक मृत्यू अपघातांमुळे… खुद्द गडकरींनीच…
Heavy vehicles banned in Narhe area on outer ring road
पुणे : बाह्यवळण मार्गावरील नऱ्हे परिसरात जड वाहनांना बंदी
Traffic rules Vietnam, Traffic rules reward ,
विश्लेषण : वाहतूक नियम मोडणारे दाखवा नि बक्षीस मिळवा… व्हिएतनाममधील अनोख्या उपायाची भारतातही नेटकऱ्यांमध्ये काय चर्चा?
new york city charges congestion fee peak-hour traffic
न्यूयॉर्कमध्ये वाहनचालकांना द्यावे लागणार ‘वाहतूक कोंडी शुल्क’! काय आहे ‘कंजेशन प्रायसिंग’? मुंबईतही अमलात येऊ शकते?

त्यानंतर सुद्धा मातीची वाहतूक सुरू होती. या वाढत्या प्रदूषणामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी ही अवजड वाहने अडवून धरली होती.पोलिसांनी अडवून धरलेली वाहने ताब्यात घेऊन त्यावर कारवाई केली जाईल व दिवाळी संपेपर्यंत वाहतूक बंद राहील असे आश्वासन दिले असल्याचे महाजन यांनी सांगितले आहे.

Story img Loader