कल्पेश भोईर
वसई : वाढती वाहनांची संख्या, रस्ते अपघात, वाहतूक कोंडी या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी शहरात अजून काही ठिकाणी नव्याने सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. यासाठी वाहतूक विभागाने पालिकेला सिग्नल यंत्रणेसाठी प्रस्ताव सादर केला आहे.
वसई-विरार शहरात काही ठिकाणी रस्ते अरुंद आहेत. तर काही ठिकाणी सिग्नल नसल्याने वाहनचालक ही भरधाव वेगाने वाहने चालवित असतात. अशा प्रकारामुळे अपघाताच्या घटना घडतात तर दुसरीकडे एकाच वेळी वाहने समोरासमोर येत असल्याने अनेकदा वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असते. या वाहतुकीचे योग्य प्रकारे नियोजन व्हावे यासाठी सध्या स्थितीत शहरात केवळ २१ ठिकाणी सिग्नल यंत्रणा अद्यावत आहे.
काही ठिकाणी गाडीचा वेग कमी करण्याच्या अनुषंगाने ब्लिंकर्सही आवश्यक आहेत . यासाठी वाहतूक पोलिसांनी शहरातील अधिक गर्दीच्या ११ ठिकाणी नवीन सिग्नल यंत्रणा उभारणी करण्यात यावी. याशिवाय १८ ठिकाणी
ब्लिंकर्स लावण्यात यावेत असा प्रस्ताव महापालिकेला सादर केला आहे.
याबाबत महापालिकेच्या अधिकारी यांच्या सोबत वाहतूक विभागाची बैठक झाली असून पालिकेकडून लवकरच ही सिग्नल यंत्रणा मंजूर करून अद्यावत केली जाईल, असे विरार वाहतूक शाखेचे वरिष्ठ वाहतूक पोलीस निरीक्षक दादाराम कारंडे यांनी सांगितले आहे.
याठिकाणी सिग्नल
• गोलानी नाका, विसावा नाका, वालीव नाका,
आचोळे क्रॉस रस्ता,
• बाभोळा नाका, ब्रॉडवे सर्कल चौक, अग्निशमन दलाच्या मुख्यालय समोरील चौक, वसंत नगरी,
भोयदापाडा
• याशिवाय तुंगार फाटा, वसई फाटा, नालासोपारा फाटा येथील उड्डाणपुलाखाली नव्याने सिग्नल बसविण्यात येणार आहेत.
‘ब्लिंकर्स’
• वर्तक कॉलेजच्या समोर, पाचपायरी (साईनाथ), विरार पूर्व, विरार पूर्व रेल्वे ओव्हर ब्रिजच्या उतरणी समोर साईबाबा नाका
• विरार पश्चिम रेल्वे ओव्हर ब्रिजच्या उतरणी समोर चौकात, गोकुळ टाऊनशिप समोर विरार, बंजारा हॉटेल समोर चार रस्ता
• छेडा पार्क नालासोपारा, हेगडे चौक नालासोपारा, सिव्हीक सेंटर , निर्मळ नाका, धानिव बाग नाका, गावराईपाडा नाका, बिलालपाडा नाका, श्रीरामनगर नाका, शान बार समोर धानिव, वाकनपाडा नाका
नवजीवन नाका, धुमाळनगर या ठिकाणी ब्लिंकर्स लावण्यात येणार आहेत.
वाहतूक नियोजनाच्या अनुषंगाने शहरातील आवश्यक त्या ठिकाणच्या रस्त्यावर नवीन सिग्नल यंत्रणा लावण्यात यावी यासाठी पालिकेला प्रस्ताव दिला आहे. पालिकेच्या सहकार्याने हे सिग्नल लावले जाणार असून त्यानुसार काम सुरू केले जाणार आहे. — सागर इंगोळे, वरिष्ठ वाहतूक पोलीस निरीक्षक, वसई.

air pollution control system has been in dust since three months
पिंपरी : हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा तीन महिन्यांपासून धूळखात
With restrictions on the export of non basmati rice the demand from the domestic market also declined Pune news
आंबेमोहर, कोलमचे दर घसरले; जाणून घ्या, ग्राहकांना काय फायदा होणार ?
dombivli ganesh nagar marathi news
डोंबिवलीतील गणेशनगरमधील रस्ता काँक्रीटीकरणासाठी बंद, नवापाड्यात जाण्यासाठी प्रवाशांचा वळसा घेऊन प्रवास
Queues at reservation centers due to technical glitch in STs app
एसटीच्या ॲपमधील तांत्रिक बिघाडामुळे आरक्षण केंद्रांवर रांगा