वसई– विरारच्या मनवेलपाडा तलावात डॉ. बाबासाहेब आंबंडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचे आश्वासन देऊनही चालढकल केली जात असल्याने आंबेडकरी कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. त्यातच महापालिकेच्या मुख्यालयातील बाबासाहेबांच्या तैलचित्राला अभिवादन करण्यासाठी पुष्पहार देखील नसल्याने या संतापात भर पडली आणि कार्यकर्त्यांनी तीन तास ठिय्या आंदोलन केले.

शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा असावा अशी भावना आंबेडकरी समाजाची होती. विरार पूर्वेला असलेल्या मनवेलपाडा तलावात बाबासाहेबांचा पुर्णाकृती पुतळा उभारावा अशी मागणी २०१८ पासून पालिकेकडे होती. वसई विरार महापालिकेने पुतळा उभारण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्याची पूर्तता न करता केवळ तलावाचे सुभोभिकरण केले. यामुळे जुलै महिन्यात विविध पक्ष आणि संघटनेतील आंबेडकरी कार्यकर्त्यांनी तलावासमोरील चौकात बाबासाहेब आंबेडकरांचा अर्धाकृती पुतळा उभारला. जो पर्यंत तलावात पुतळा उभारला जात नाही तो पर्यंत नाक्यावरील अर्धाकृती पुतळा हटवला जाणार नाही, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली होती. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. जुलै महिन्यात पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची आंदोलनकर्त्यांची भेट घेतली होती. कायदेशीर बाबी तपासून मनवेलपाडा तलावात डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्याचे निर्देश त्यांनी महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार आणि जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांना दिले होते. मात्र अद्याप हा पुतळा उभारण्यासंदर्भात कुठलाही निर्णय झालेला नव्हता.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा >>>वसई विरारमधील महावितरणचे वीज ग्राहक सेवा केंद्र बंद

कार्यकर्त्यांचा संताप..

शुक्रवारी डॉ बाबासाहेब आंबेकरांचा महापरिनिर्वाण दिन असल्याने सर्वत्र आंबेडकरांना अभिवादन केले जात होते. मात्र पालिका मुख्यालयालयात बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार देखील नसल्याने या संतापात भर पडली. पालिकेचा निषेध करत संविधान बचाव कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी पालिका मुख्यालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन सुरू केेले. तब्बल ३ तास हे आंदोलन सुरू होते. नालासोपार्‍याचे आमदार राजन नाईक यांनी आंदोलकांची भेट घेतली आणि पालिका अधिकार्‍यांना पाचारण केले. बाबासाहेबांचा पुतळा उभारण्यासाठी माझा पुढाकार असेल असे त्यांनी सांगितले. पालिकेचे प्रभारी आयुक्त रमेश मनाळे यांनी यावेळी पाठपुरव्याचे आश्वासन दिले.

हेही वाचा >>>आमदार स्नेहा दुबे पंडित यांचा बविआला पहिला धक्का; “कार्यक्रमात राजकीय हस्तक्षेप नको”, पालिका अधिकार्‍यांना ताकीद

जुलै महिन्यात पुतळा उभारण्यासंदर्भात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पालिकेला निर्देश दिले होते. यासाठी नियुक्त समितीमध्ये जिल्हाधिकारी अध्यक्ष आहेत तर पालिका आयुक्त सचिव आहेत. मात्र पालिकेने प्राथमिक अहवाल देखील सादर केला नाही, असा आरोप ॲड गिरीश दिवाणजी यांनी केला. पालिका साधे तैलचित्राला पुष्पहार अर्पण करत नाही. त्यामुळे पुतळा उभारण्याची मानसिकता दिसत नाही, असे कार्यकर्त्यांनी सांगितले.

पुतळा उभारण्याच्या परवागनीचे सर्वाधिकार जिल्हाधिकार्‍यांना आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना पत्रव्यवहार केला आहे. पुतळा उभारण्यासाठी सर्व प्रकारच्या परवागन्या, ना हरकत दाखला आवश्यक आहेत. त्यांच्या संमतीनंतर पुढील प्रक्रिया सुरू केली जाईल, असे प्रभारी आयुक्त रमेश मनाळे यांनी सांगितले.

Story img Loader