बेवारस वाहनांचा प्रश्न प्रलंबित

मीरा-भाईंदर शहरात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बेवारस वाहनाचा प्रश्न पुन्हा जटील होऊ  लागला आहे.

महिन्याभरात दहाच वाहनांवर कारवाई

भाईंदर : मीरा-भाईंदर शहरात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बेवारस वाहनाचा प्रश्न पुन्हा जटील होऊ  लागला आहे. या पडीक वाहनांवर कारवाई करण्याकरिता पालिकेने धोरण निश्चित केले असूनही गेल्या महिन्यभरापासून केवळ दहा वाहनांवरच कारवाई करण्यात आली आहे.

मीरा-भाईंदर शहरात रस्त्यावर तसेच सार्वजनिक ठिकाणी अनेक बेवारस वाहने भंगार अवस्थेत धूळ खात पडून असल्यास त्याचा वाहतुकीवर परिणाम होतो. तसेच पावसाळ्यात बेवारस वाहनांमध्ये डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता अधिक असते. परिणामी आसपासच्या नागरिकांना डासांपासून साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असल्याने महापालिकेकडून अशा वाहनांवर कारवाई करण्यात येते. परंतु तरीदेखील शहरात अनेक भागांत अशी बेवारस वाहने रस्त्याच्या कडेला उभी असलेली दिसून येत आहे. काही भागांत तर वाहने भंगार झाली असली तरी उचलण्यात आली नाहीत. त्यामुळे रस्त्याच्या दुरुस्तीचे काम, नळजोडणीचे काम तसेच डांबरीकरण करण्यास अडथळे निर्माण होत आहेत. बेवारस वाहने ठेवण्यासाठी महापालिकेने भाईंदर पूर्व परिसरातील स्व. बाळासाहेब ठाकरे मैदानाजवळील महापालिकेच्या आरक्षण मैदानावर गोदाम तयार करण्यात आले आहे. मात्र या गोदामामध्ये ठेवण्यात येणारी वाहनेदेखील सुरक्षित नसल्यामुळे कारवाई मंदावली असल्याचे आरोप करण्यात येत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व वसई विरार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Question unattended vehicles pending ysh

Next Story
चंद्रपाडा- वाकीपाडय़ातील पाणीप्रश्न मार्गी
ताज्या बातम्या