वसई विरार महापालिकेने जून महिन्याच्या अखेपर्यंत तब्बल ८२ कोटी १७ लाख रुपयांची मालमत्ता कराची विक्रमी वसुली केली आहे. मागील वर्षांच्या तुलनेत जून महिन्यात ४० कोटी रुपयांनी मालमत्ता कराचे उत्पन्न वाढले आहे. पालिकेच्या इतिहासामध्ये जून महिन्यात प्रथमच एवढी विक्रमी उत्पन्न जमा झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई विरार महापालिका क्षेत्रात ९ लाख ७ हजार १७७ एवढय़ा मालमत्ता आहेत. पालिकेची मागील आर्थिक वर्षांत ३१२ कोटींची वसुली झाली होती. या वर्षी पालिकेने ५०० कोटी रुपये मालमत्ता कराच्या वसुलीचे उद्दिष्ट ठेवले आहे. अधिकाधिक मालमत्ता कराच्या वसुलीसाठी पालिकेने पहिल्या दिवसापासूनच उपाययोजना सुरू केल्या होत्या. ३० जूनपर्यंत पालिकेने ८२ कोटी १७ लाख रुपयांची मालमत्ता कराची वसुली केली आहे. मागील वर्षी हेच प्रमाण ४० कोटी ९२ लाख एवढे होते. म्हणजेच पालिकेने मागील वर्षांच्या तुलनेत ४० कोटी रुपयांची जास्त वसुली केली आहे. १५ जूनपर्यंत पालिकेच्या तिजोरीत ५० कोटी रुपयांचा मालमत्ता कर जमा झाला होता. गुरुवार, ३० जून रोजी महिन्याच्या शेवटच्या दिवशी एका दिवसात साडेतीन कोटी रुपये जमा झाले होते.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Record tax collection of the municipality in june rs 82 crore property tax deposited in municipal coffers amy
First published on: 02-07-2022 at 00:03 IST