सूर्या  पाणी प्रकल्पाच्या जलशुद्धीकरणातील वाया जाणाऱ्या पाण्यावर पुनप्र्रक्रिया; दररोज आठ दशलक्ष लिटर पाण्याची बचत

वसई : सूर्या पाणी प्रकल्पाच्या जलशुद्धीकरणातून वाया जाणाऱ्या पाण्यावर पुनप्र्रक्रिया करून ते पाणी पुन्हा वापरात आणण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यासाठी दुक्टण येथे ८ कोटी रुपयांचा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यामुळे दररोज ८ दशलक्ष लिटर पाण्याची बचत होणार  आहे.

crime
आमदार गीता जैन यांच्या संस्थेतील प्रकार; छायाचित्रे चोरून संचालिकेला ब्लॅकमेल, तिघांवर गुन्हा दाखल
Accused who absconded after killing arrested after 34 years
हत्या करून फरार झालेल्या आरोपीला ३४ वर्षांनी अटक; मध्यवर्ती गुन्हे शाखेची कारवाई
tankers, Tanker inspection drive,
टॅंकरच्या बेदरकारपणाला आवर, अपघात दुर्घटनेनंतर वाहतूक विभागाकडून टॅंकर तपासणी मोहीम
Vasai, Solar power, subsidy scheme,
वसई : सौर उर्जा अनुदानाची योजना कागदावरच, ६ वर्षांपासून एकालाही अनुदान नाही

वसई, विरार शहराला सूर्या पाणी प्रकल्पाच्या दोन्ही टप्प्यातून दररोज २०० दशलक्ष लिटर, उसगाव आणि पेल्हारमधून ३० दलशक्ष लिटर असा मिळून दररोज २३० दशलक्ष लिटर एवढा पाणीपुरवठा होत असतो. सूर्या प्रकल्पाचे पाणी पालघर येथील दुक्टण येथील जलशुद्धीकरण प्रकल्पात आणले जाते. तेथे पाण्याचे शुद्धीकरण केल्यानंतर ते पाणी शहरात वितरित केले जाते. परंतु जलशुद्धीकरण प्रकल्पात पाण्यावर प्रक्रिया होत असताना ८ दशलक्ष लिटर पाणी वाया जात असते. हे पाणी समुद्रात सोडण्यात येते. मुळात शहरातील पाण्याची मागणी जास्त असताना ८ दशलक्ष लिटर पाणी नाईलाजाने वाया जात आहे. त्यामुळे हे जलशुद्धीकरण प्रकल्पातून वाया जाणाऱ्या पाण्यावर पुनप्र्रक्रिया करून ते पाणी पुन्हा वापरात आणण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यासाठी दुक्टण येथेच एक पुनर्पक्रिया प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पासाठी लागणारा ८ कोटी रुपयांचानिधी मिळावा यासाठी पालिकेने राज्य शासनाला प्रस्ताव सादर केला आहे.

याबाबत माहिती देताना पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने सांगितले की, कुठल्याही जलशुद्धीकरण प्रकल्पात पाण्यावर प्रक्रिया करत असताना पाणी वाया जात असते. सूर्या प्रकल्पातून दररोज २०० दशलक्ष लिटर पाणी येत असल्याने पाणी वाया जाण्याचे प्रमाण ८ दशलक्ष लिटर आहे. या पाण्यावर पुर्नप्रक्रिया केल्यास ते पुन्हा वापरता आणणे शक्य आहे. त्यासाठी  हा प्रकल्प उभारत आहोत.  हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर शहराला ८ दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी मिळू शकणार आहे.

पाणीगळतीचे प्रमाण १५ टक्के

वसई, विरार शहराला दिवसाला २३० दशलक्ष लिटर पाण्याचा होतो. त्यात पाणी गळतीचे प्रमाण १५ टक्के आहे. म्हणजे दिवसाला ३४.५ दशलक्ष लिटर पाणी वाया जात असचे.  गळतीचे हे प्रमाण इतर महानगर पालिकेच्या तुलनेने सर्वाधिक आहे. अशा पद्धतीने दर महिन्याला ३४. ५ दशलक्ष लिटर प्रमाणे पालिकेला दिवसाला ३ लाख ३१ हजार ४४१ रुपये वाया जात असतात. या वाया जाणाऱ्या पाण्यामुळे महिन्याला ९९ लाख ४३ हजार २३० रुपये आणि वर्षांला ११ कोटी ९३ लाख रुपये पाणी गळतीमुळे वाया जात आहेत. दुसरीकडे प्रति माणशी १३५ दशलक्ष लिटर पाण्याची गरज असताना पालिकेकडून केवळ ११० लिटर पाणी सरासरी दिले जात आहे. शहरातील २४ लाख लोकसंख्येला ३५० दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे. मात्र कमी पाणी आणि पाण्याची गळती मिळून दरररोज शहराला १२० दशलक्ष लिटर पाणी कमी मिळत आहे.