२०२५ -३० या दरम्यान घेण्यात येणाऱ्या निवडणुकीसाठी हे सरपंच आरक्षण जाहीर केले आहे.

वसई: वसईत ३१ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षणे नुकताच वसई तहसीलदार कार्यालयात जाहीर करण्यात आली. १२ ग्रामपंचायती या बिगर अनुसूचित क्षेत्रासाठी राखीव असून अन्य १९ ग्रामपंचायती या अनुचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात  आल्या आहेत. विशेषतः १० ग्रामपंचायत मध्ये अनुसूचित जमातीसाठी महिला आरक्षण पडले आहे. २०२५ -३० या दरम्यान घेण्यात येणाऱ्या निवडणुकीसाठी हे सरपंच आरक्षण जाहीर केले आहे.

वसई तालुक्यात ३१ ग्रामपंचायती असून त्यापैकी १९ ग्रामपंचायत या अनुसूचित क्षेत्रात मोडतात. यापैकी १० ग्रामपंचायती अनुसूचित जमातीतील महिलांसाठी राखीव झाल्या असून सकवार, टिवरी, चंद्रपाडा, टोकरे, मालजीपाडा, तिल्हेर, पोमण, शिरवली, खानिवडे, भाताणे या १० ग्रामपंचायतीचा समावेश आहे तर उर्वरित ९  ग्रामपंचायती या अनसूचित जमातीतील पुरूषांसाठी राखीव झाल्या आहेत असून यात मेढे, माजिवली-देपीवली, आडणे-भिनार, पारोळ, करंजोण, नागले, शिवणसई, उसगाव, सायवन या ९ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तसेच १२ ग्रामपंचायती या बिगर अनुसूचित क्षेत्रासाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. 

यातील अनुसूचित जमाती महिलांसाठी १ तर नागरिकांचा मागास प्रवर्गमधील सर्व साधारण २ ग्रामपंचायत राखीव करण्यात आल्या आहेत. इतर  ग्रामपंचायत सर्वसाधारण गटासाठी आरक्षित असून यामध्ये ४ ग्रामपंचायती  आहेत .तसेच अनुसूचित जाती (स्त्री राखीव) साठी १  तर सर्व साधारण स्त्री राखीव मधे ४ ग्रामपंचायती आहेत.  अर्नाळा, वासळई, तरखड, टेम्भी व पाली या ग्रामपंचायतीचे सरपंच पद सर्वसाधारण स्त्री साठी राखीव झाले आहे.

तर नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण गटात अर्नाळा किल्ला तसेच नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला राखीव) यात खार्डी व डोलीव ग्रामपंचायत आहे. सर्वसाधारण पुरुष गटात कळंब, खोचिवडे, सत्पाळा व पाणजू ग्रामपंचायतीचा समावेश करण्यात आला आहे. तसेच अनुसूचित जाती (स्त्री राखीव) रानगाव ग्रामपंचायती साठी आरक्षित करण्यात आले आहे.

या ग्रामपंचायत निवडणूका २०२५ – २०३० या कालावधी दरम्यान होणाऱ्या निवडणुकांसाठी हे आरक्षण लागू असणार आहे.नुकताच वसईचे तहसीलदार डॉ अविनाश कोष्टी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सरपंच आरक्षण प्रक्रिया पार पडली.आरक्षण सोडत प्रक्रिये वेळी तालुक्यातील विविध ग्रामपंचायत क्षेत्रातील राजकीय पक्षाचे प्रतिनिधी,मंडळ अधिकारी, तलाठी यासह नागरिक उपस्थित होते.

२०२५-३० या दरम्यान होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांसाठी आरक्षण प्रक्रिया घेण्यात आली आहे. आम्ही ३१ ग्रामपंचायत सरपंच पदासाठीचे सोडत पद्धतीने आरक्षण जाहीर केले आहे. :- डॉ अविनाश कोष्टी, तहसीलदार वसई.

राजकीय पक्षांच्या हालचाली सुरू

सरपंच हा सुरवातीला निवडून आलेल्या सदस्यामधून नियुक्त केला जात होता. मात्र आता सरपंच थेट जनतेतून निवडला जात असल्याने सरपंच पदाचे महत्त्व आणखीनच वाढले आहे.हे आरक्षण २०२५ ते २०३० या कालावधी दरम्यान होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांसाठी लागू असणार आहे. त्यामुळे आतापासूनच विविध राजकीय पक्षांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तर दुसरीकडे काही इच्छुक असलेले उमेदवार ही हळूहळू तयारीला लागले असल्याची चर्चा सुरू झाली आहे. काही ठिकाणी सोडत पध्दतीने काढलेल्या आरक्षणामुळे आरक्षणात बदल झाल्याने इच्छुक असलेल्याचा हिरमोड झाला आहे.