वसई: वसईचा निकाल हा ९७.५० टक्के इतका लागला आहे. या लागलेल्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. वसई तालुक्यातून ३३ हजार ४२ इतके विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यात १७ हजार ९६३ मुले तर १५ हजार ७९ मुलींचा समावेश आहे. यात ३२ हजार २१९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
पालघर जिल्ह्यात वसई तालुक्यातून सर्वाधिक विद्यार्थी परीक्षेला बसले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दहावीच्या परीक्षेसाठी ३३ हजार ३८२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ३३ हजार ४२ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले होते त्यातून ३२ हजार २१९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, वसई तालुक्याचा एकूण ९७.५० टक्के इतका निकाल लागला असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. यात ९६.८२ टक्के मुलं तर ९८.३२ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Result of vasai student exams from vasai taluka palghar district amy
First published on: 18-06-2022 at 00:09 IST