थेट वाहतूक पोलिसाच्या अंगावर घातली रिक्षा ; रिक्षावाल्याची वाढती मुजोरी

नालासोपाऱ्यात कर्तव्यावर असलेल्या एका वाहतूक पोलिसाच्या अंगावर रिक्षावाल्याने चक्क रिक्षा नेल्याचा प्रकार समोर आला आहे.

नालासोपाऱ्यात कर्तव्यावर असलेल्या एका वाहतूक पोलिसाच्या अंगावर रिक्षावाल्याने चक्क रिक्षा नेल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अजूनही कोणताही गुन्हा दाखल झाला नाही.

नालासोपाऱ्यात रिक्षा अडवणाऱ्या वाहतूक पोलिसाच्या अंगावर रिक्षा घालण्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. वाहतूक पोलिसांनी याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल केला नसल्याचे तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी सांगितले.
नालासोपारा पूर्वेकडील तुळींज रोड च्या दिशेने स्टेशन कडे येत असताना उड्डाणपूला जवळ एक रिक्षा चालक रिक्षा मध्ये जास्त प्रवासी वाहून नेत असताना वाहतूक पोलिसाने रिक्षा चालकाला थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्या रिक्षा चालकाने रिक्षा न थांबवता पोलिसाच्या अंगावरून रिक्षा दमटवीत पुढे घेऊन पसार झाला. वाहतूक पोलीस नियमांची पायमल्ली करणाऱ्या वाहनचालकावर कारवाई करीत असतात मात्र काही मुजोर निर्ढावलेले रिक्षाचालक दादागिरी करताना दिसत आहेत. अशा रिक्षा चालकावर कठोर कारवाई करणे गरजेचे असताना वाहतूक पोलिसांनी त्या रिक्षा चालका विरोधात गुन्हा का दाखल केला नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rickshaws placed directly body traffic police rickshaw puller traffic police filed a crime amy

Next Story
परिवहन दरवाढीचा प्रस्ताव महासभेने फेटाळला!; नागरिकांना मोठा दिलासा
फोटो गॅलरी