scorecardresearch

नालासोपाऱ्यात बंदुकीच्या धाकावर सराफच्या दुकानात लूट; १५ तोळे दागिने घेऊन आरोपी फरार

सोन्याची नाणी विकत घेण्याच्या बहाण्याने आरोपी दुकानात शिरला आणि बंदुकीच्या धाकावर १५ तोळे दागिने लुटल्याचे समोर आले आहे.

नालासोपाऱ्यात बंदुकीच्या धाकावर सराफच्या दुकानात लूट; १५ तोळे दागिने घेऊन आरोपी फरार
नालासोपाऱ्यात बंदुकीच्या धाकावर सराफच्या दुकानात लूट

नालासोपारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी सराफच्या दुकानावर दरोडा टाकल्याची घटना घडली आहे. एका अज्ञात इसमाने बंदुकीच्या धाकावर दुकानाती १५ तोळे दागिने लुटले. या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

हेही वाचा- आयसीआयसीआय बॅंक दरोड्यातील आरोपी अनिल दुबे फरार; वसई न्यायालयातून पोलिसांना चकमा देत पलायन

नालासोपाराच्या पश्चिमेला असलेल्या पाटणकर परिसरातील नेकलेस ज्वेलरचे दुकान आहे. या दुकानात शनिवारी दुपारी २५ वर्ष्याचा इसम आला होता. त्याने दुकानदाराला सोन्याचे नाणी विकत घ्यायचे असल्याचे सांगितले. दुकान मालकाने सोन्याची नाणी विकत नसल्याचे सांगितले. यावेळी माझ्या बहिणीला सोन्याचे दागिने सुद्धा खरेदी करायचे आहेत म्हणून इतर सोन्याचे दागिने दाखवा असे सांगत दुकानदाराला बोलण्यात गुंतवून ठेवले. आणि दरम्यान खिशातील पिस्तूल काढून दुकानदाराला पिस्तूलचा धाक दाखवत दागिने लुटण्यास सुरवात केली. पण या इसमाच्या हातातील पिस्तूल नकली असल्याचे जेव्हा दुकानदाराला लक्षात आले, तेव्हा त्याने त्याला विरोध केला. दोघांमध्ये झाटापटी झाली, आणि चोराने दुकानदाराला ढकलून दुकानातून पोबारा केला. यावेळी त्याने १५ तोळे सोन्याचे दागिने लुटून नेल्याचे दुकानदाराने पोलीस फिर्यादित सांगितले आहे.

हेही वाचा- Shraddha Walker murder case: आफताबची आठ तास ‘पॉलीग्राफ’ चाचणी; सदनिकेतून पाच चाकू जप्त

याबाबत माहिती देताना नालासोपारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे यांनी माहिती दिली की, लुटारू इसम तोंडावर मास्क लावून आला होता, त्याने त्याची बहीण येणार असल्याचे सांगत दुकानात अर्धा ते पाऊण तास काढला जेव्हा दुकानात दुकान मालकसह कुणी नसल्याचे पाहत के कृत्य केले आहे. पोलिसांनी घटना स्थळावरून सिसिटीव्ही ताब्यात घेतले असून आरोपीचा शोध सुरु आहे असे सांगितले.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-11-2022 at 20:41 IST

संबंधित बातम्या